आदर्श गाव : पद्मश्री पोपटराव पवारांच्या हिवरे बाजारचा इथेही आदर्श ; कोरोनामुक्तीचा वसा आणि संकल्पपूर्ती


भारत हा खेड्यांचा देश आहे. बहुसंख्य लोकसंख्या खेड्यांमध्ये राहते. खेड्यांची अवस्था फारशी चांगली नाही, ज्यामुळे लोक शहरांमध्ये स्थलांतर करतात. परंतु अशी काही गावे देखील आहेत ज्यांच्याविषयी ऐकून आपण स्तब्ध होतो. अशा गावांची भरभराट व समृद्धी शहरांना देखील प्रेरणा देणारी आहे. असेच एक गाव म्हणजे महाराष्ट्राचे हिवरे बाजार.


हिवरे बाजार हे अहमदनगर जिल्ह्यात आहे, जे भारतातील सर्वात श्रीमंत गाव असल्याचे म्हटले जाते.  Adarsh ​​Gaon: The ideal of Padma Shri Popatrao Pawar’s Hiware Bazaar Corona Free now


विशेष प्रतिनिधी

अहमदनगर : संपूर्ण देशात नावलौकिक असलेल्या आदर्श गाव हिवरे बाजारनं कोरोना काळातही आदर्श घडवला आहे. गावात सध्या कोरोनाचा फक्त एकच रुग्ण उपचार घेत आहे. तोही १५ मे रोजी घरी परतणार असल्यानं आठवडाभरात गाव कोरोनामुक्त होणार आहे. एकिकडं अहमदनगर जिल्हा कोरोना रुग्णसंख्येबाबात आघाडीवर असताना हिवरे बाजरनं घेतलेला कोरोनामुक्तीचा वसा कौतुकास्पद आहे.

अहमदनगरमध्ये अगदी गावागावात मोठ्या संख्येनं कोरोना रुग्ण आढळत होते. हिवरे बाजार या आदर्श गावातही एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जवळपास ५० जणांना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं. यापैकी ३२ जण हे गावात राहणारेच होते. तर उर्वरीत गावाचेच रहिवाशी पण कामानिमित्त बाहेरगावी असणारे असे होते.

यातील २५ रुग्ण हे हिवरे बाजार प्रशिक्षण केंद्राच्या विलगीकरण कक्षात होते. तर १८ जणांना घरीच विलगीकरणात ठेवलेले होते. पाच रुग्ण अत्यंत गंभीर होते पण त्यांनीही कोरोनावर मात केली. मात्र दोन जणांचा या रोगानं बळी घेतला. पण या रुग्णांपैकी सध्या सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. केवळ एका रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत. हा रुग्ण सध्या नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून तोही १५ मे रोजी घरी परतणार आहे. त्यामुळं १५ मे रोजी हिवरे बाजार गाव कोरोनामुक्त होत आहे.कोरोनारुपी राक्षसाला पुन्हा गावात प्रवेश करू द्यायचा नाही असा संकल्प सध्या ग्रामस्थांनी घेतल्याचं आदर्शगाव कार्य व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी दिली आहे. त्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.

सध्या शेतीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यामुळं राज्यातील इतर भागांतून आलेले सुमारे ३०० शेतमजूर गावात आहेत. त्यांची सर्वांची तपासणी करून शेतातच त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. तसेच त्यांची दर आठवड्याला तपासणी केली जाते. लक्षणं आढळल्यास त्यांचं विलगीकरण करून लगेच उपचार केले जातात.

गावातील स्वयसेवकांची ४ पथके तयार केली असून प्रत्येक आठवडयाला ऑक्सिजन व तापमान तपासणी करण्यात येते व त्यानुसार नोंदी ठेवण्यात आल्या आहेत.

Adarsh ​​Gaon : The ideal of Padma Shri Popatrao Pawar’s Hiware Bazaar Corona Free now

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!