सरकारसोबत आता शून्य संपर्क; मनोज जरांगे म्हणाले- निवडणुकीला दगड जरी उभा केला तरी त्याला निवडून द्या!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षणासाठी अवघ्या राज्याचे रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी आता विधानसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. आंतरवाली सराटी येथील बेमुदत उपोषण संपवून छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जरांगेंनी गुरुवारी मराठा समाजाला आपण दिलेल्या उमेदवारामागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. मी दिलेला उमेदवार दगड असला तरी त्याला निवडून द्या. मी त्याच्याकडून बरोबर काम करून घेतो, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला.Zero contact with government now; Manoj Jarange said – Even if you put a stone in the election, elect him!

मनोज जरांगे गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, आम्ही सर्वच जातीधर्मांचे उमेदवार देणार. फक्त समाजाने मी दिलेल्या उमेदवाराला मतदान करावे. मी उमेदवार म्हणून दगड दिला तरी त्यांनी त्याला निवडून द्यावे. त्यानंतर मी त्याच्याकडून बरोबर काम करून घेतो.



सरकारसोबत शून्य संपर्क

देवेंद्र फडणवीस आमच्या आई-बहिणीला बोलले. हे आम्ही सहन करायचे? सध्या सरकारसोबत आमचा संपर्क शून्य आहे. जोपर्यंत सहन होते, तोपर्यंत सहन करू. नंतर सर्वकाही बाहेर काढू. 7 ते 13 ऑगस्ट दरम्यान कितीही पाऊस किंवा पूर येऊ द्या आमच्या माताभगिनी रस्त्यांवर दिसतील, असे मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे यांनी यावेळी मंत्री तथा बडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी भुजबळांचा उल्लेख येवल्याचा गेंडा म्हणून केला. ते म्हणाले, येवल्याच्या गेंड्याला काही फरक पडत नाही. प्रसाद लाड बोलत आहेत, पण फडणवीस त्यांना थांबवत नाहीत. दरेकरांच्या चकाट्या ऐकण्यास मला वेळ नाही. आपले गोरगरीब फडणवीस यांच्या टेबलाजवळ बसायचे, पण ते उत्तर देत नाहीत.

माझ्यावर टीका हा त्यांच्या अभिनयाचा भाग आहे. राणे साहेबांवर मी बोललो नाही. त्यामुळे त्यांनी नीलेश व नीतेश या दोन्ही मुलांना समजून सांगावे. कारण, माझा पट्टा तुटला तर मग कठीण होईल. इतर नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांना माझ्याविरोधात मोहीम राबवण्याचे निर्देश दिलेत. मी सरकारवर विश्वास ठेवला, पण हे बिलिंदर लोकांना मध्ये टाकत आहेत. मला ट्रॅप केले जात आहे. फडणवीस हेच खरी सत्ता चालवत असून, यामुळेच भाजपचे वाटोळे होत आहे, असेही मनोज जरांगे यावेळी बोलताना म्हणाले.

जवळपास 13 ते 14 वर्षांनंतर माझ्यावर आता कारवाई करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी गोरगरिबांसाठी संघर्ष करत असल्याचे त्यांना पाहवत नाही. मला बदनाम करण्यासाठी हे सुरू आहे. फडणवीस यांना हे शोभत नाही. आमची मोहीम बदनाम करू नका. त्यांनी हे प्रकरण गोडी गुलाबीने हाताळले तर ते त्यांच्या अंगलट येणार नाही, असेही मनोज जरांगे यावेळी फडणवीस यांना उद्देशून म्हणाले.

पवार आमच्या बाजूने बोलले असतील असे वाटत नाही

मनोज जरांगे यांनी यावेळी शरद पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, शरद पवार आमच्या बाजूने बोलले असतील असे मला वाटत नाही. ते बोलले असतील तर त्यांनी ते थेट बोलावे. काहीही लपवून ठेवू नये. 19 ऑगस्ट रोजी मी मराठा समाजाची बैठक बोलावून सर्व जाहीर करणार आहे. आमची बाजू मांडणारा कुणी असेल तर त्याला निवडून देणार आहे, असे ते म्हणाले.

Zero contact with government now; Manoj Jarange said – Even if you put a stone in the election, elect him!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात