Yusuf Lakdawala : संजय राऊतांचे राणा दंपत्यावरील आरोप राजीव गांधी – पवारांपर्यंत पोहोचले!!

प्रतिनिधी

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा याचा मुंबईतला म्होरक्या युसुफ लकडावाला याच्याकडून खासदार नवनीत राणा – आमदार रवी राणा या दाम्पत्याने 80 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, असा गौप्यस्फोट करणारा आरोप खासदार संजय राऊत यांनी काल केला होता. यासंदर्भात त्यांनी काही कागदपत्रे देखील सादर केली होती.Yusuf Lakdawala: Sanjay Raut’s allegations against Rana couple reached Rajiv Gandhi-Pawar

परंतु आता हा आरोप फक्त नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या पर्यंतच मर्यादित राहिला नसून त्यापलिकडे या आरोपाने दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना देखील घेरले आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवर राणा दाम्पत्याने युसुफ लकडावाला यांच्याकडून 80 लाखाचे कर्ज घेतल्याची कागदपत्रे सादर केली होती.



आता युसुफ लकडावाला बरोबरचे राजीव गांधी आणि शरद पवारांबरोबरचे फोटो भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून शेअर केले आहेत. डी गँगशी त्यांचे कसे संबंध आले पहा!!, असे ट्विट मोहित कंबोज यांनी करून त्यात संजय राऊत यांना टॅग करण्यात आले आहे. त्यामुळे एक प्रकारे संजय राऊत यांनी डी गँगचा विषय उकरून काढून नेमके कोणाला टार्गेट करण्याचे ठरवले होते?, याविषयी शंका उपस्थित होत आहे.

Yusuf Lakdawala: Sanjay Raut’s allegations against Rana couple reached Rajiv Gandhi-Pawar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात