
घरातून एक संगणक, एक लॅपटॉप, तीन मोबाईल फोन आणि एक राऊटर जप्त
विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) वेबसाईट हॅक करून गट ‘ब’ आणि ‘क’ परीक्षेच्या उमेदवारांचे हॉल तिकीट तपशील (रोल क्रमांक) काढल्याप्रकरणी, नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने पुण्यातून आरोपीचे नाव रोहित कांबळे या १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणी घटनेचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. Youth arrested for hacking MPSC website
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले की, तरुणाला त्याच्या चिखली येथील घरावर छापा टाकून अटक करण्यात आली. छाप्यात त्याच्या घरातून एक संगणक, एक लॅपटॉप, तीन मोबाईल फोन आणि एक राऊटर सापडले.
आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, एमपीएससीने या वर्षी 20 एप्रिल रोजी उमेदवारांना हॉल तिकीट मिळविण्यासाठी आपल्या वेबसाइटवर एक बाह्य लिंक दिली होती आणि आरोपीने ही लिंक हॅक केली आणि तेथून 94,195 उमेदवारांचे तपशील कॉपी केले, शिवाय ‘MPSC 2023-A’ नामक टेलिग्राम चॅनेलवर बेकायदेशीरपणे शेअर केले.
तसेच ते म्हणाले की, एमपीएससी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ निरीक्षक विजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सायबर सेलकडे वर्ग करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Youth arrested for hacking MPSC website
महत्वाच्या बातम्या
- अमेरिकेपेक्षा जास्त भेदक क्षेपणास्त्राची इराणकडून निर्मिती, 2,000 किमी पल्ला, अमेरिका-इस्रायलपर्यंत पोहोचण्यास सक्षम
- पाकिस्तानात हिंदू मुलीचे बळजबरी धर्मांतर, तिथल्या कोर्टाने पीडितेला त्याच गुंडांच्या ताब्यात दिले; 12 वर्षांत 14000 धर्मांतर प्रकरणे
- सुप्रीम कोर्टात आज नव्या संसदेच्या उद्घाटनावर सुनावणी, राष्ट्रपतींकडून उद्घाटन व्हावे यासाठी याचिका दाखल
- कर्नाटकात उद्या 24 आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ, सिद्धरामय्या आज राहुल गांधींची भेट घेणार