घरातले वरिष्ठ विरोधात प्रचार करतील, पण तुम्ही मला साथ द्या; अजितदादांची बारामतीकरांना साद!!

विशेष प्रतिनिधी

बारामती :  आता पवार घरामध्ये दोनच वरिष्ठ उरले आहेत. एक बारामतीत, एक पुण्यात असतात. माझे सगळे नातेवाईक आणि घरातले वरिष्ठ माझ्या विरोधात प्रचार करतील. पण मी बारामतीकरांचे काम करतो. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्या, अशा स्पष्ट शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज बारामतीकरांना साद घातली. You support me Ajit pawar talk to Baramatikars

तुम्हाला वाटेल की हे आतून सगळे एकच आहेत. आत्ता एकमेकांच्या विरोधात लढतील आणि नंतर एकत्रच येऊन आपल्याला फसवतील. पण मी सांगतो तसे काहीही घडणार नाही. आता सगळे वेगळे झाले आहे. आमच्या घरात आता दोनच वरिष्ठ उरले आहेत. एक बारामतीत आहेत, तर दुसरे पुण्यात असतात. ते आणि बाकीचे सगळे माझे नातेवाईक माझ्या विरोधात प्रचार करतील, पण तुम्ही बारामतीकरांनी मला साथ द्यावी, असे आवाहन अजित पवारांनी केले.

बारामतीत अजित पवार गटाचा बुथ कमिटी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे संकेत दिले. बारामतीत उमेदवार कोण असणार??, हे त्यांनी स्पष्ट केले. बारामतीमध्ये तुमच्यासमोर चार-पाच वेळा खासदार असणारा उमेदवार असणार आहे. आपला उमेदवार नवखा असणार आहे. पहिल्यांदा खासदार होणार असणार आहे. पण निवडून गेलेल्या खासदारापेक्षा जास्त काम करणार असणार आहे. हा अजित पवार यांचा शब्द आहे, असे सांगत अजित पवार यांनी प्रथमच खासदारकीला उभा राहणारा उमेदवार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे बारामतीमधून सुनेत्रा पवार उमेदवार असणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

सुनेत्रा पवार यांची जोरात तयारी

बारामती लोकसभा मतदार संघात सुनेत्रा लोकसभेसाठी खासदारकी लढवणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. केवळ यासंदर्भात अधिकृत घोषणा बाकी आहे. आता बारामती परिसरात सुनेत्रा पवार यांच्या माहिती व कार्याचा आढावा घेणारा प्रचार रथ फिरू लागला आहे. त्यासाठी गाडीवर फ्लॅक्स लावले आहे. आज बारामती बुथ मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी पुन्हा नवखा उमेदवार असणार असल्याचे वक्तव्य केले.

आता निवडणूक महत्वाची

आता निवडणूक महत्त्वाची आहे. पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरायचे आहे. त्यासाठी बुथ कमिटीचे काम महत्त्वाचे आहे. हे काम ज्यांना जमणार नाही, त्यांनी सांगावे. शेवटी सगळ्यांना विचार स्वतंत्र आहे. आता जागरूकतेने काम करावे लागणार आहे. डोळ्यात तेल घालून काम करायचे आहे. आपला जो उमेदवार अधिकृत असेल त्याला बळ दिले पाहिजे. मनात संभ्रम ठेवू नका.

घड्याळ तेच वेळ नवी

अवघ्या काही दिवसांत लोकसभेची निवडणूक जाहीर होईल. या निवडणुकीत आपली घड्याळ तेच आहे पण वेळ नवी आहे, असे अजित पवार म्हणाले. की, आपली महायुती आहे.

You support me Ajit pawar talk to Baramatikars

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात