तुमच्याकडे एक आरोपी गायब आहे. तर आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे. कुठे गेला माहीत नाही. केस सुरू आहे, असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंग यांना लगावला.You have the accused but we have the complainant missing, I don’t know where he went, but the case is ongoing; Uddhav Thackeray’s tola from Parambir Singh
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं नाव न घेता टोला लगावला आहे. तुमच्याकडे एक आरोपी गायब आहे. तर आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे. कुठे गेला माहीत नाही. केस सुरू आहे, असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंग यांना लगावला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी हा टोला लगावला. अनेकदा कोर्टात जाऊन जाऊन आयुष्य निघून जातं. त्याचा खर्च परवडत नाही. 1958 सालापासून एक आरोपी गायब असल्याचं तुम्ही म्हणता. पण चंद्रचूड साहेब आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे. तरीही केस सुरू आहे.
तक्रारदार गायब, कुठे पळून गेला माहीत नाही. पण आरोप केलेत ना मग खणून काढ.खणलं जातंय.चौकश्या सुरू आहे. धाडसत्रं सुरू आहे. या पद्धतीला चौकट आणण्याची गरज आहे, असं सांगतानाच न्यायदान ही केवळ न्यायालयाची जबाबदारी नाही. ही सर्वांची जबाबदारी आहे. हे टीमवर्क आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
इमारतीच्या भूमीपूजनाला मी नव्हतो पण झेंडा लावायला आलो हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. या इमारतीबाबत आपण ऐकला आहे. खंडपीठाचा इतिहास उपस्थितांना माहीत आहे. ही इमारत पाहिल्यानंतर मला वाटतं. ही इमारत पाहण्यासाठीही लोकं आली पाहिजे. त्यांना पकडून आणण्याची वेळ येऊ नये. मराठीत म्हण आहे शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये. पण होतं असं कार्यक्रमाच्या निमित्ताने माझं कोर्टात येणं जाणं होतं.
दिपंकर रत्तूजी यांनी परवानगी दिली म्हणून मुंबईतील कोर्टाची इमारत लोकांसाठी खुली केली. व्हेरिटॉज वॉक म्हणून. एक कोर्ट रुम आहे. तिथेच लोकमान्य म्हणाले, स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे ही गर्जना केली. त्या वास्तूत गेल्यावर रोमांच येतात. आज तुमच्यासमोर मला बोलताना दडपण येतं. तेव्हा त्या सिंहाने त्या न्यायाधीशासमोर गर्जना कशी केली असेल या भावनेने रोमांच उठतात, असं ते म्हणाले.
मी तुम्हाला कोर्टासाठी इमारत देणार आहे. आणि आपल्याच काळात ही इमारत पूर्ण करणार आहे, अशी ग्वाही देतानाच अजूनही न्यायादान प्रक्रियेत विलंब होतो त्यात सामान्य माणूस पिचला जातो. परंतु न्यायदानात गतिमानता आणण्यासाठी सरकार म्हणून जे करायचं ते आम्ही करू, असंही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App