विशेष प्रतिनिधी
पुणे: Pune ऐन दिवाळी राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी मुंबई आणि उपनगरांसह विदर्भ व मराठवाड्यातील काही भागांवर पावसाने जोरदार हल्ला चढवला. सध्या बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे, पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.Pune
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.Pune
त्यानुसार 22 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, नांदेड, यवतमाळ, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
याशिवाय 23 ऑक्टोबर रोजी पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ गोंदिया, गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
24 ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ नागपूर, चंद्रपूर.
25 ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, संभाजीनगर, बीड, धाराशिव जिह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App