विशेष प्रतिनिधी
मुंबई : एमपीएससी विद्यार्थी आत्महत्या ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. एकूणच एमपीएससीच्या कार्यपध्दतीचे नव्याने अवलोकन करणे आवश्यक आहे, अनेक जागा रिक्त आहेत, परीक्षा उशिरा होतात. एमपीएससीला स्वायत्तता हवी आहे पण स्वैराचार नको आहे, असे भाजपचे नेते , माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.workings of the MPSC to be Observe again : Fadnavis
सोलापूर येथील मराठा मोर्चाबाबत ते म्हणाले,सरकार पोलिस यांच्यामार्फत लोकांना थांबवू शकेल. पण, त्यांच्या मनातील खदखद थांबवू शकणार नाही. भोसले समितीने स्पष्ट म्हंटलं आहे की, मागासवर्गीय आयोग नेमावा लागेल,
हा राज्य सरकारचा विषय आहे , केंद्र सरकारचा नाही. त्या दिशेने राज्य सरकारने पावले टाकली पाहिजेत.वारीबाबत बोलताना ते म्हणाले, भागवत धर्माची पताका खाली ठेवायला सांगणे चुकीचे आहे. मोगललाई निझाम काळातही असं झालं नव्हतं.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App