एमपीएससी प्रकरण हातळण्यात सरकार कमी पडले; अजित पवारांचा “घरचा आहेर”; अजितदादांच्या परखड भाष्यामागचे राजकारण काय…??

प्रतिनिधी

पुणे : एमपीएससी प्रकरण हाताळताना सरकार कमी पडले, असा घरचा आहेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याच सरकारला आज दिला.Ajit Pawar blames his own govt over MPSC preexamination issue

एमपीएससी परीक्षेतील गोंधळावरून विद्यार्थ्यांनी राज्यभर एका दिवसात मोठा दबाव तयार करून ठाकरे – पवार सरकारला माघार घ्यायला भाग पाडले. त्या मुद्द्यावर अजित पवारांनी पुण्यात भाष्य केले. ते म्हणाले की, “या प्रकरणात राजकारण आणण्याची गरज नाही.एमपीएससी स्वायत्त संस्था आहे. त्याच्यात काहींनी राजकारण तापवण्याचा प्रयत्न केला. आमचा एमपीएससीच्या मुलांना पाठिंबा आहे मात्र सरकार काहीतरी वेगळे करतेय असे भासवण्याचा प्रयत्न झाला.

त्यासंदर्भात मी दुपारीच मुख्यमंत्र्यांशी बोललो. यावेळी त्यांनी आपण स्वत: यामध्ये लक्ष घातल्याचे सांगितले. त्यांनी एमपीएससीला सांगून विद्यार्थ्यांच्या बाबतीत वातावरण अशा पद्दतीने खराब करणे योग्य नसल्याचे सांगितले”.

जर पूर्वनियोजित ठरले होते तर विद्यार्थ्यांवर अशी वेळ का आली, असे विचारले असता अजित पवार म्हणाले की, “मी अजून एमपीएससीचा अध्यक्ष झालेलो नाही, झालो की याचे उत्तर देईन…मी पहिल्यांदाच सांगितले की एमपीएससीने हे सर्व करत असताना व्यवस्थितपणे प्रकरण हाताळायला हवे होते.

एमपीएससी प्रकरण हाताळण्यात सरकार कमी पडले हे माझे स्पष्ट वैयक्तिक मत आहे. राज्याचे प्रमुख बोलले आहेत. आम्ही प्रमुखांच्या हाताखाली काम करत आहोत. उद्धव ठाकरेंनी निर्णय दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी सरकार करेल. आणि आमचा पाठिंबा राहील.

झाली ती दुर्दैवी घटना म्हटली पाहिजे. विद्यार्थ्यांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ नाही आली पाहिजे, असे मत अजित पवारांनी व्यक्त केले.

अजितदादांच्या परखड भाष्यामागे राजकारण काय

अजित पवारांनी हे परखड मत व्यक्त केल्याबद्दल जरी कौतूक होत असले, तरी त्यामागचे राजकारण समजून घेतले पाहिजे. कालच्या सगळ्या प्रकारात नाव आले, ठाकरे सरकारचे. त्या विभागाचे मंत्री आहेत, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार. ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याने हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

परीक्षा रद्द केल्याचे एमपीएससीने पत्रक काढल्यानंतर त्यांनी खुलासा केला, की मला यातले काही माहितीच नाही. त्यावर एमपीएससीने त्यांना मंत्रालयातून आलेल्या आदेशाचे पत्रकच दाखविले. त्यावरून वडेट्टीवार उघडे पडले.

मुख्यमंत्र्यांना फेसबुक लाइव्ह करावे लागले. विद्यार्थ्यांचा रोष पत्करावा लागला. आणि आज अजित पवार म्हणताहेत, एमपीएससी प्रकरण हाताळण्यात सरकार कमी पडले. यात त्यांचे राजकीय नुकसान काय होतेय!!

Ajit Pawar blames his own govt over MPSC preexamination issue

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*