जागतिक महिला दिनाच्या सर्व माता-भगिनींना शुभेच्छा, देत मांडली भूमिका
विशेष प्रनिनधी
मुंबई : Raj Thackeray महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त समस्त माता-भगिनींना शुभेच्छा दिल्या. तसेच एक्सवर एक पोस्ट शेअर करून आपली भूमिकाही मांडली. राज ठाकरे म्हणाले, ‘ मी अनेकदा माझ्या भाषणांमध्ये म्हणत आलो आहे की, जर आसपास मोठं परिवर्तन अपेक्षित असेल तर स्त्रियांचा राजकारणातील सहभाग हा वाढायलाच हवा आणि त्यासाठी फक्त आरक्षण देऊन पुरेसं नाही तर महिलांनी राजकारणात येऊन त्यांना त्यांचे निर्णय स्वतंत्रपणे घेण्यासाठीची व्यवस्था निर्माण करायला हवी. ‘Raj Thackeray
आज भारतच काय जगासमोर जी अनेक आव्हानं आहेत, त्या आव्हानांपैकी सगळ्यात गंभीर कुठलं आव्हान असेल तर ते पर्यावरणाच्या ह्रासाचं. आणि यावर अगदी मुळापासून काम कोण करू शकत असेल तर त्या महिलाच हे माझं ठाम मत आहे. याबाबतच एक फारच चांगलं उदाहरण आहे ते ‘पूर्णिमा देवी बर्मन’ यांचं. ‘टाईम’ या प्रख्यात आंतरराष्ट्रीय मासिकाच्या २०२५ सालच्या ‘विमेन ऑफ द इयर’ च्या यादीत ज्यांचा समावेश आहे, त्या ‘पूर्णिमा देवी बर्मन’.
आसामच्या कामरूप भागात जन्मलेल्या पूर्णिमा देवी यांचं शिक्षण प्राणिशास्त्रातलं आणि, पुढे त्यांनी जैवविविधता या विषयांत पीएचडी संपादन केली. हे सुरु असताना २००७ ला त्यांना एक शेतकरी झाडाची फांदी कापताना दिसला. कारण काय? तर त्यावर करकोच्याच घरटं होतं. हा पक्षी आसाममध्ये फारसा शुभ मानला जात नव्हता, मग अशा पक्षाचं घर माझ्या आवारात का ? म्हणून त्याचं घरटंच नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु होता. एक पक्षी जर अशाप्रकारे उध्वस्त झाला तर फक्त तो पक्षी नाही संपूर्ण पर्यावरणाची व्यवस्थाच बिघडेल, हे त्यांच्यातल्या जैवविविध अभ्यासकाला माहित होतं. म्हणून त्यांनी ‘ह्रगिला आर्मी’ थोडक्यात १०,००० स्त्रियांचा एक ग्रुपच तयार केला आणि संपूर्ण आसाममध्ये त्यांनी करकोचा पक्षी वाचवण्यासाठी एक चळवळ सुरु केली. याचा दृश्य परिणाम म्हणजे पुढे १६ वर्षांत करकोचे जे नामशेष पक्ष्यांच्या यादीत गेले होते ते पुन्हा पुनर्स्थापित झाले आणि या १०,००० महिलांसाठी पूर्णिमा देवींनी बचत गट देखील तयार केले.
अशी उदाहरणं ही देशात आणि महराष्ट्रात देखील आहेत. अशा कामांबाबतची महिलांची अंतःप्रेरणा ही शक्तिशाली असते आणि त्यातून निर्माण होणारं काम मोठं असतं हा अनुभव आहे. या अंतःप्रेरणेला, शक्तीला अधिक ताकद मिळू दे हीच इच्छा. माझ्या पक्षात मी अनेक महिला मेळाव्यात सांगितलं आहे की ज्यांना फक्त राजकारणच नाही तर समाजकारणात सुद्धा काही चांगलं काम करायचं असेल त्यांनी जरूर यावं, इथे तुमच्या सर्जनशीलतेला पूर्ण वाव असेल. पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App