वृत्तसंस्था
मुंबई : ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेऊ नयेत, हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. without OBC reservation No election’, resolution passed today
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज हा ठराव विधानसभेत मांडला. आता तो निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार आहे. यासंदर्भात सकाळी विधिमंडळात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली.ठराव मांडल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याला पाठिंबा दिला.
या निर्णयामुळे आता आगामी महापालिकेसह अन्य निवडणुका किमान सहा महिने पुढे ढकलल्या जाणार असून मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक नेमले जाणार आहेत. जोपर्यंत सरकार इंम्पिरिकल डेटा गोळा करून सादर करत नाही. तो पर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. तसेच निवडणुकाही होणार नाहीत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more