विशेष प्रतिनिधी
मुंबई :Girish Mahajan राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या हनी ट्रॅप प्रकरणावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या वादात आता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. “एकनाथ खडसे… तुमच्या या गुलाबी गप्पा कोणासोबत रंगल्या आहेत?” असा खोचक सवाल करत महाजन यांनी प्रफुल लोढा आणि खडसे यांचा एकत्र फोटो X (माजी ट्विटर) या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.Girish Mahajan
महाजनांनी लिहिलं आहे की , “एकनाथ खडसे… काय तुझी ही व्यथा? तुमचे षड्यंत्र आता जनतेसमोर उघड होतंय. हाच तो प्रफुल लोढा ज्याला तुम्ही ‘दारूडा’ म्हणाला होतात? आणि हाच तो लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केला होता… आता त्याचाच आधार घेऊन तुम्ही माझ्यावर आरोप करताय?”Girish Mahajan
महाजन यांचा हा टोकाचा हल्लाबोल केवळ फोटोंपुरता मर्यादित नव्हता. त्यांनी यापूर्वीच्या प्रकरणांची आठवण करून देत 2019 ते 2022 या काळात खडसेंकडून केले गेलेले आरोप आणि त्यानंतर झालेल्या चौकशींचा उल्लेख करत स्वतःवरचे सर्व आरोप खोटे ठरले, हेही ठामपणे मांडले. “ईडी, आर्थिक गुन्हे शाखा, सर्वच यंत्रणांनी चौकशी केली, पण मी निर्दोष ठरलो,” असेही त्यांनी नमूद केले.
हनी ट्रॅप प्रकरण समोर आल्यानंतर सुरुवातीला प्रफुल लोढाचे गिरीश महाजनांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. यावर महाजनांनी पलटवार करत “लोढा हा सर्वपक्षीय आहे” असे सांगून त्याचे शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे फोटो दाखवले होते. या पार्श्वभूमीवर आता त्यांनी खडसे यांच्यासोबत लोढाचा मास्कधारी फोटोही पोस्ट करत त्यांच्यावर डाव साधला आहे.
खास गोष्ट म्हणजे, महाजनांनी वापरलेला “गुलाबी गप्पा” हा शब्दप्रयोग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातून सूचकतेने हनी ट्रॅप प्रकरणाशी खडसे यांचा संबंध असल्याचा आभास निर्माण केला जात आहे. महाजनांनी एकप्रकारे खडसेंना प्रश्न विचारताच त्यांच्या राजकीय भूमिकेवरही संशय व्यक्त केला आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी यापूर्वी प्रफुल लोढावर गंभीर आरोप करत त्याच्याशी गिरीश महाजन यांचे संबंध असल्याचे सांगितले होते. मात्र, आता हेच महाजन खडसेंवर त्याच प्रकारचे प्रत्यारोप करत आहेत, त्यामुळे या वादाला आता नवे वळण मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App