प्रतिनिधी
रायगड : रायगड जिल्ह्याच्या राजकारण शिवसेनेचे तीन आमदार विरुद्ध पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला असताना शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी आता खासदार सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांना सुनावून घेतले आहे.Wine sale in supermarkets: Thackeray-Pawar government waits for withdrawal!
शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या कृपेने सुनील तटकरे लोकसभेत पोहोचले, पण आता आरोग्य केंद्राच्या लोकार्पणाचे निमंत्रण देऊनही देखील तटकरे पिता – पुत्री इथे पोचले नाहीत. त्याची राजकीय किंमत त्यांना चुकवावी लागेल, असे शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांनी त्यांना जयंत पाटलांच्या हजेरीत सुनावले आहे.
रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी या तिघांनी आदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्री पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. माजी खासदार अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचा जन्मच मूळात काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे, असे टीकास्त्र सोडले होते.
या पार्श्वभूमीवर आधीच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय विस्तव जात नसताना आता शेकापच्या नेत्यांनी देखील सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांना ठणकावले आहे. कुर्डूस गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी माजी आमदार पंडित पाटलांनी तटकरे पिता – पुत्रींना टोले लगावले. आगामी जिल्हा परिषद निवडणूकीत शेकापच्या मतांवरच अध्यक्ष निवडून येईल, याची आठवण पंडित पाटलांनी करून दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App