कुणी कसे कपडे वापरायचे हे संघपरिवार ठरवणार का? नवाब मलिक यांचा प्रश्न

विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशामध्ये कुणी काय खायचं, कुणी कसे कपडे वापरायचे हे भाजप आणि संघपरिवार ठरवणार का? असा संतप्त प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधानांना ट्वीट करुन केला. Will the ‘Sanghparivar’ decide how to use the clothes?Question of Nawab Malik

मुस्लिम मुली हायस्कूल आणि महाविद्यालयात जाऊन शिकत आहेत ही समस्या आहे का? मुलींना शिकवा या घोषणेचे काय झाले? असाही सवाल नवाब मलिक यांनी ट्वीट करुन पंतप्रधानांना विचारला आहे.



भाजप आणि संघपरिवाराकडून नागरिकांच्या मुलभूत अधिकारांची ही सरळसरळ पायमल्ली आहे, असेही नवाब मलिक यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. हिजाब परिधान करण्यावरून नव्याने निर्माण झालेल्या वादावर ते बोलत होते.

Will the ‘Sanghparivar’ decide how to use the clothes?Question of Nawab Malik

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात