विशेष प्रतिनिधी
पुणे: पुणे महापालिकेची प्रारूप प्रभागरचना तयार करतांना भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या निर्णयांमुळे, येणाऱ्या निवडणुकीत स्वबळावर ११० जागा जिंकण्यासाठी जाळं विणल्याचा आरोप भाजपवर केला जातोय. तसंच यामुळे महायुतीमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षातील कार्यकर्ते नाराज असल्याची देखील चांगलीच चर्चा रंगली आहे. Mahayuti
महापालिकेने सोमवारी ही प्रारूप प्रभागरचना तयार करून, नगरसेवक विभागाला सादर केली आहे. नगरसेवक विभाग ही रचना निवडणूक आयोगासमोर सदर करणार आहे. आजवर प्रभाग रचनेत नेहमीच राज्यातील सत्ताधारी पक्षाचचं या पारड जड राहिलेलं आहे. त्यामुळे यावेळी भाजपनेही केवळ त्यांना अनुकूल असा आराखडा तयार केल्याचं समजतं आहे. तसंच यावरून भाजपाने महायुतीमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही घटक पक्षांना शहरातील रचनेत फारसे विश्वासात न घेतल्याचा आरोप केला जातोय.
दरम्यान, एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असल्यामुळे पुण्याच्या रचनेत शिवसेनेला अनुकूल असे बदल होतील, असा विश्वास शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी दाखवला आहे. तर दुसरीकडे या रचनेत कुठलेही मोठे बदल होणार नाहीत, असा दावा भाजपचे स्थानिक नेते करत आहेत.
या प्रभाग रचनेचा आराखडा आज नगरसेवक विभागाने निवडणूक आयोगासमोर सादर करणे अपेक्षित होते. मात्र या रचनेत बदल करण्यासाठी नगरसेवक विभागाला अजून २ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे आता पुण्यातील नगरविकास विभाग शिवसेनेच्या स्थानिक गटाच्या बाजूने झुकतो, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावाखाली तयार केलेल्या आराखड्यालाच अंतिम स्वरूप दिलं जातं, हे येत्या काहीच दिवसांत स्पष्ट होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App