सत्तावृक्ष कन्येसाठी लावतोय बाबा; पण बहर येईल का हो त्याला?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यामागच्या घटना घडामोडी बघितल्या आणि एका जुन्या अजरामर मराठी गीताची आठवण झाली. त्या गीताचे गीतकार होते, पी. सावळाराम. संगीतकार होते वसंत प्रभू आणि गायिका होत्या दस्तुरखुद्द गानकोकिळा लता मंगेशकर! हे गीत पी. सावळाराम यांनी रचले होते, लतादीदींचे पिताजी स्व. दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त… या गीताचे बोल होते,Will sharad Pawar be able to “establish” supriya sule’s leadership over NCP??



कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला वैभवाने बहरून आला याल का हो बघायाला?

सावळारामांची प्रासादिक गीतरचना, वसंत प्रभूंचे संगीत आणि लतादीदींचे स्वर्गीय स्वर याने हे गीत अजरामर झाले. एक कर्तृत्व संपन्न पिता आपल्या कन्येसाठी कल्पवृक्ष लावून गेला आणि तो नंतर वैभवाने बहरला, असे हे आशयसंपन्न गीत आहे.

पण राष्ट्रवादीतल्या घटना घडामोडींवर नजर टाकताना ते गीत सहज आठवले आणि त्यातल्या ओळी अशा फिरल्या…

सत्तावृक्ष कन्येसाठी लावतोय बाबा; पण “पाने”, “फुले”, “फळांचा” तो, बहर येईल का हो त्याला?

कल्पवृक्ष लावणारा तो बाबा संगीत क्षेत्रातला सूर्य होता. पण सत्तावृक्ष लावणारा हा बाबा महाराष्ट्रातल्या राजकारणातला दिग्गज आहे. दोन्हीही बाबांचे आपल्या कन्येवर विलक्षण प्रेम होते आणि आहे. दोघांनी आपापल्या परीने आपल्या कन्यांसाठी आपल्या जवळ जे जे आहे, ते ते भरभरून दिले होते आणि आहे. कल्पवृक्ष लावलेल्या बाबाच्या कन्येच्या वैभवाला तिच्या दैवी स्वरांनी आणि कर्तृत्व संपन्नतेने बहर आला आणि त्या कन्येने आपल्या बाबांना ते वैभव पाहायला बोलाविले!

आता जो बाबा कन्येसाठी सत्तावृक्ष लावतोय, तो वृक्ष कन्येच्या राजकीय कर्तृत्वाने “पाने”, “फुले”, “फळे” यांनी बहरेल का?, हा खरा प्रश्न आहे. कारण कलेतला कल्पवृक्ष बहरायला बाबांच्या कन्येने आपल्या दैवी स्वरांच्या गुणवत्तेचे सिंचन केले होते. पण राजकारणातला हा बाबा लावत असलेल्या ‘सत्तावृक्ष’ बहरायला नेमके कशाचे सिंचन करावे लागेल? हा कळीचा प्रश्न आहे!

Will sharad Pawar be able to “establish” supriya sule’s leadership over NCP??

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात