विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंदू धर्मासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हिंदू धर्माचा अपमान सहन करणार नाही, अशी ताकीद त्यांनी दिली आहे.
सुळे यांनी कार्यक्रमात बोलताना “मी रामकृष्ण हरीवाली आहे, फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी मटण खाते. मी जे खाते ते माझ्या पांडुरंगाला मान्य आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?” असे म्हणत आपल्या भूमिकेचे समर्थन केले. त्यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले की, हिंदू धर्माची हीच व्यापकता आहे की कोणाला मटण मासे खाण्यावर कोणतीही सक्ती किंवा बंधन नाही. सुळे सातही दिवस मटण खात असतील तर ती त्यांची व्यक्तिगत बाब आहे.
परंतु सुळे या लव्ह जिहादसारख्या विषयांना पाठिंबा देतात आणि पांडुरंग व वारकरी परंपरेवर टिप्पणी करून इतरांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे सर्वश्रुत आहे, असा आरोप त्यांनी केला. राणे यांनी इशारा देत सांगितले की, “जर सुळे मंदिरात जाऊन वारकरी संप्रदायाचा अपमान करणारे शब्द वापरत असतील, तर वारकरी समाजासह प्रत्येकाने त्याविरोधात आवाज उठवायला हवा.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App