‘’धनगर समाजाला २५ हजार घरं देणार’’ देवेंद्र फडणवीसांची घोषणा!

मुंबईत धनगर समाजाच्यावतीने फडणवीसांच्या सत्कार समारंभाचे करण्यात आले होते आयोजन

प्रतिनिधी

मुंबई  : यंदा शिंदे-फडणवीस सरकारने नुकताच आपला अर्थसंकल्प जाहीर केला. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला पहिला अर्थसंक्लप सादर करताना, समजातील सर्व घटकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला. शिवाय विविध योजनांसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी भरघोस निधीची तरतूदही केली. याच पार्श्वभूमीवर मुंबईत धनगर समाजाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. याप्रसंगी फडणवीसांनी एक मोठी घोषणा केली. Will give 25 thousand houses to the  Dhangar community Devendra Fadnavis announcement

‘’मेंढपाळांना आजही त्यांचं हक्काचं घर नाही. गरजूंना घरे उपलब्ध करून देण्यासाठी अनेक घरांच्या योजना तयार होत असतात. परंतू सर्व समाजाच्या तुलनेत आजही धनगर समाजाला पाहिजे त्या प्रमाणात घरं मिळत नाहीत. म्हणून यावेळी ठरवलं की घरं तर बांधायचीच. पण त्यातली २५ हजार घरं ही धनगर समाजाला देणार आहोत.’’ अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कांद्याला प्रतिक्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान!!


यंदाच्या अर्थसंकल्पात धनगर समाजाच्या कल्याणकारी योजना दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी धनगर समाजाकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी फडणवीसांना पिवळ्या रंगाचा फेटा बांधून व अंगावर घोंगडी चढवत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी धनगर समाजातील बांधवांशी संवाद साधताना फडणवीसांनी वरील आश्वासन दिलं.

यावेळी फडणवीसांनी विरोधकांकडून सुरू असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. फडणवीस म्हणाले,’’विरोधकांना बजेटविरोधात बोलायला काही उरलं नाही. विरोधक केवळ निष्फळ टीका करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यावेळेस मी बजेट बनवतो त्यावेळेस मी सगळ्या गोष्टींचा विचार करून बनवतो.  अर्थसंकल्पात ज्या घोषणा केल्या आहेत, त्या अस्तित्वात आणण्याचं काम आमचं आहे. विरोधकांचं काम टीका करणं आहे. ते फक्त टीका करतील. पण मी कोणत्याही टीकेला घाबरत नाही. आम्ही विकास करत राहणार.’’

Will give 25 thousand houses to the  Dhangar community Devendra Fadnavis announcement

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात