नाशिक : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवरच दुगाण्या झोडल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये त्यांनी आपल्या सोयीचे राजकारण साधून घेतले. Ajit Pawar
ज्यांनी माझ्यावर 70000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्याबरोबरच मी आज सत्तेवर बसलो आहे. पिंपरी चिंचवड महापालिका मागच्या सत्ताधाऱ्यांनी धुवून खाल्ली. कुत्र्याच्या नसबंदीतही पैसे खाल्ले गेले. पिंपरी चिंचवड मध्ये खोदाई माफिया तयार केले, अशी एका चढ एक वक्तव्ये अजित पवारांनी केली.
– पिंपरी चिंचवडच्या स्थानिक नेते गप्प
मात्र पिंपरी चिंचवड भाजपचे नेते महेश लांडगे आणि इतर अजित पवारांच्या आरोपांवर मूग गिळून गप्प बसले. त्यांनी अजित पवारांना ताबडतोब कुठलेही प्रत्युत्तर दिले नाही. त्यामुळे अजित पवारांनी भाजपला ठोकले त्यावर भाजपचे स्थानिक नेते एकदम गप्प बसले अशी वातावरण निर्मिती मराठी माध्यमांनी केली.
– रवींद्र चव्हाणांचे सौम्य भाषेत उत्तर
मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांना सौम्य आणि संयमी भाषेत प्रत्युत्तर दिले. अजित पवारांनी जे काही आरोप केलेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या भाजप वर केलेत. आम्ही काही आरोप प्रत्यारोप करून बोलायला लागलो तर त्यांची अडचण होईल, हे त्यांनी लक्षात घ्यावे. मी दिलेल्या उत्तरानंतर त्यांचे पुस्तक बंद होईल, अशी अपेक्षा करतो, असे रवींद्र चव्हाण पत्रकार परिषदेत म्हणाले. त्यानंतर सुद्धा पत्रकारांनी अजित पवारांच्या आरोपांसंदर्भातच अनेक प्रश्न विचारले त्यावर रवींद्र चव्हाण यांनी अजित पवार सोडून बाकीचे काही विचारा हो!! कारण मी इथे पुण्याचा विकासाचे व्हिजन मांडायला आलो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुण्याच्या विकासाचे व्हिजन आम्ही मांडून ते पूर्णत्वास नेऊ हे सांगायला आलो आहे, असे स्पष्ट केले.
– रट्ट नेत्याला सौम्य भाषा समजेल का??
एकूणच भाजपच्या नेत्यांनी अजित पवारांचे आरोप हलक्यात घेतले. त्यांना संयमी भाषेत प्रत्युत्तर दिले. अजित पवारांसारख्या मुरलेल्या आणि रट्ट नेत्याला असल्या संयमी भाषेतले प्रस्तुतर समजेल का??, रुचेल का?? पचेल का आणि मुख्य म्हणजे पुरे पडेल का??, असे एका पाठोपाठ एक सवाल समोर आलेत.
कारण अजित पवार हे स्पष्टवक्तेपणाच्या नावाखाली दादागिरी करणारे नेते आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात त्यांनी अनेकदा काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना जुमानले नाही. त्यांनी आणि शरद पवारांनी नेहमीच काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांवर कुरघोडी करायचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या राजकीय मजबुरीपोटी काँग्रेसला पवार काका – पुतण्यांची दादागिरी सहन करावी. त्यामुळे अजित पवार जास्तच चढेल बनले होते.
– नुसती सौम्य भाषा नाही कामाची
पण भाजपच्या राजवटीत तशी स्थिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतलाच पाहिजे, अशी भाजपची मजबुरी नाही. तरीदेखील भाजपचे नेते संयमी भाषा वापरून अजितदादांना उत्तरे देत असतील तर अजितदादांना ते नेमकेपणाने समजून घेता आले पाहिजे. अन्यथा अजितदादांचे विविध घोटाळे आणि त्यांचा मुलगा पार्थ यांच्या जमीन घोटाळ्यावर कठोर कारवाई करून अजितदादांना आणि किंबहुना पवार कुटुंबीयांना राजकीय दृष्ट्या वठणीवर आणायचे काम भाजपच्या नेत्यांना करावे लागेल तिथे अदानी – भाजप, अदानी – पवार असली राजकीय समीकरणे वापरून चालणार नाही. कारण भाजपच्या सत्तेच्या वळचणीलाच बसून अजितदादा कुरघोडी करत असतील आणि त्यांना पवार आतून फूस देणार असतील, तर भाजपची होणारी अडचण सोडवायला अदानी येणार नाहीत ती अडचण भाजपच्या नेत्यांना कठोर कारवाई करूनच सोडवून घ्यावी लागेल. हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापासून ते राज्य नेतृत्वापर्यंत समजून घ्यावे लागेल आणि त्यानुसार कृती करावी लागेल अन्यथा अजितदादांची राजकीय मस्ती सहन करणे भाजपच्या स्थानिक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना असह्य होईल. भाजपच्या कुठल्याही पातळीवरच्या नेत्यांनी अथवा कार्यकर्त्यांनी हे घडू देऊ नये, अशी मतदारांचीही अपेक्षा असेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App