मद्यावरील कर कमी का केला?, उपमुख्यमंत्री अजितदादांनी विरोधकांना दिले प्रत्युत्तर!! पण कोणते??… पेट्रोल – डिझेलचे काय??

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारवर “सस्ती दारू महंगा तेल”, अशा शब्दात निशाणा साधला होता. यातल्या “सस्ती दारू” या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. Why was the tax on alcohol reduced ?, Deputy Chief Minister Ajit Pawar replied to the opposition



मद्यावरचा कर कमी का केला?, या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, की महाराष्ट्रात मद्यावर 300% कर होता. तो आधीच लावण्यात आला होता. मी सर्व राज्यांमध्ये व्यवस्थित माहिती घेतली. कोणत्याही राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मद्यावर नाही. त्यामुळे कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मद्यावरचा कर कमी करूनही इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात त्याच्यावर अजूनही अधिकच कर आहे. जास्त कर ठेवला तर करचुकवेगिरी वाढते, असा अनुभव आहे. त्यामुळे मद्यावरचा कर महाराष्ट्रात कमी केला आहे.

– पेट्रोल डिझेलचे काय? प्रश्न अनुत्तरित

एकीकडे अजित पवार यांनी मद्यावरचा कर कमी का केला?, या प्रश्नाचे उत्तर दिले असले तरी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरच्या उत्पादन शुल्कात 5 आणि 10 रुपयांची घट केली आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक राज्यांनी आपापल्या राज्यांमध्ये मूल्यवर्धित कर देखील कमी केले आहेत. परंतु, महाराष्ट्राने मात्र अजूनही पेट्रोल आणि डिझेल वरचा मूल्यवर्धित कर कमी केलेला नाही. याबाबत कोणताही खुलासा महाविकास आघाडी सरकारच्यावतीने अजून करण्यात आलेला नाही.

Why was the tax on alcohol reduced ?, Deputy Chief Minister Ajit Pawar replied to the opposition

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात