महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक होताना शरद पवारांना नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आपली जवळी का दाखवावी लागते??, हा “मिलियन डॉलर क्वेश्चन” आहे. Why sharad pawar showed intimacy with Modi while attacking fadnavis??
कारण काल देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देताना पवारांनी आपण “गुगली प्रयोग” केल्याचे स्वनामधन्य विधान केले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी उत्साहाच्या भरात “बाप तो बाप” होता है” असे मिम्स चालवले. पण त्यापलीकडे जाऊन पवारांना आपल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध खऱ्या अर्थाने आक्रमक का होत आले नाही?? त्यांना आपले मोदींशी वैयक्तिक काही मतभेद नाहीत, असे का सांगावे लागले??, हा खरा प्रश्न आहे.
घराणेशाहीवर हल्ला
वास्तविक अमेरिका दौऱ्यावरून परत आल्यानंतर मोदींनी भाजपच्या 10 लाख बूथ प्रमुखांना संबोधताना देशातल्या सर्वांच्या घराणेशाहीवर प्रखर हल्ला चढविला. त्यात पवार अनेकांपैकी एक होते. त्यातही मोदींनी पवारांवर हल्ला करताना पवार कन्येचे नाव न घेता तुम्हाला स्वतःच्या मुलांचे भले करायचे असेल, तर भाजपला मत द्या आणि पवारांच्या कन्येचे भले करायचे असेल, तर राष्ट्रवादीला मत द्या असे जाहीर सांगताना प्रथमच थेट हल्लाबोल केला होता. मग पवारांनी मोदींना प्रत्युत्तर देताना एवढे बचावात्मक होण्याचे काय कारण होते?? पवारांनी मोदींना प्रत्युत्तर देताना आपली मुलगी स्वकर्तृत्वावर तीनदा संसदेत पोहोचल्याच्या डिंग्या मारल्या. पण लगेच आपली मोदींशी कशी जवळीक आहे याचा किस्साही सांगून मोकळे झाले. टिळक पुरस्कार परस्पर जाहीर करून औचित्य भंग केला.
लवासा ते शिखर बँक
पण मूळात त्यापलीकडे जाऊन पवारांना आपली मोदींशी फार जवळीक आहे, असे वारंवार का सांगावे लागते?? त्याचे नेमके रहस्य काय आहे?? हा खरा प्रश्न आहे.
वास्तविक पवारांच्या लवासापासून शिखर बँकेपर्यंतच्या कुठल्याही केसेसच्या फाईल्स पूर्णपणे बंद झालेल्या नाहीत. लवासाची आजही केस आजही कोर्टात पेंडिंग आहे. त्याच वेळी शिखर बँकेची केस दिल्ली हायकोर्टात पेंडिंग आहे. या केसेस केव्हाही एक्सपीडाईट होऊ शकतात. याची भीती पवारांना वाटते आहे का??, की पवारांची ही नेहमीची राजकीय स्टाईल झाली आहे, की आपली मोदींशी जवळीक दाखवून आपले “राष्ट्रीय नेतृत्व” वारंवार सिद्ध करत राहायचे आणि फडणवीसांसारख्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वावर सातत्याने एक विशिष्ट दबाव तयार करत राहायचे!!
पवारांची स्टाईल जुनी झाली
ते काहीही असले तरी पवारांची ही स्टाईल जुनी झाली आहे. आता फडणवीसही महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांनी इतकेच किंबहुना पवारांपेक्षा कमी वयाचे असूनही पवारांपेक्षा जास्त लोणच्या इतकी मुरले आहेत. त्यामुळेच फडणवीसांनी गेल्या काही दिवसांमध्ये पवारांना डायरेक्ट अंगावर घ्यायचे ठरविले आहे. किंबहुना पवारांना पूर्ण एक्सपोज करायचे ठरवले आहे. यात “वरचा” पाठिंबा असल्याशिवाय फडणवीस तसे करणार नाहीत. त्यामुळेच आता पवारांचा खऱ्या अर्थाने प्रतिमाभंग होतो आहे!!
चाणक्यगिरीचे वलय संपतेय
पवारांनीच तयार केलेल्या महाराष्ट्रातल्या पवारनिष्ठ माध्यमांनी पवारांभोवती त्यांच्या नसलेल्या चाणक्यगिरीचे वलय तयार करून ठेवले आहे. हे वलय आता नष्ट होत आहे. रिपब्लिक टीव्ही ते दूरदर्शन या प्रत्येक माध्यमांना दिलेल्या हिंदी मुलाखतींमध्ये फडणवीसांनी पवारांना पुरते एक्स्पोज केले आहे. पवार हे आत्तापर्यंतच्या राजकारणात सर्वांना कसे फसवत आले, याची एकापाठोपाठ एक उदाहरणे फडणवीस यांनी पुराव्यानिशी या मुलाखतींमधून जनतेसमोर मांडली आहेत. मग भले पवारांच्या विश्वासघातकी राजकारणाला राष्ट्रवादीचे समर्थक “चाणक्यगिरी” समजत असतील, तरी पवारांचे मूळ विश्वासघातकी राजकारण फडणवीस एक्सपोज करत आहेत आणि त्याचाच पवारांना फार मोठा धोका पवारांना वाटतो आहे!!
फडणवीसांवर वेळीच “कंट्रोल” आणला नाही, तर ते आणखी धोकादायक ठरू शकतात, याची भीती पवारांना वाटत असल्याने त्यांना आपली मोदींशी जवळीक वारंवार दाखवावी लागत आहे.
पवारांच्या घराणेशाहीला स्थान नाही
पण 2024 च्या पार्श्वभूमीवर पवारांचा हा डाव यशस्वी होईलच याची कोणी गॅरेंटी घेऊ शकत नाही. कारण मोदींशी पवारांची भले जवळीक असेल, पण ती विशिष्ट परिस्थितीत होती. त्यापलीकडे नाही. मोदींनी आता कोणत्याही स्थितीत देशातल्या घराणेशाहीची टक्कर घ्यायचा निर्णय घेतला आहे. तो त्यांच्या पक्षीय राजकारणाचा किंबहुना त्यांच्या वैचारिक संघीय राजकारणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यात पवारांसारख्या घराणेशाहीला स्थान नाही. पवारांचे भले मोदींशी वैयक्तिक संबंध असतीलही, पण म्हणून पवारांची घराणेशाही मोदींना त्यांचे वैचारिक संघीय राजकारण चालवू देणार नाही. अर्थातच 2014 पासून गांधी घराण्याची जी गत मोदींच्या राजकारणाने केली आहे, तीच गत आता 2024 च्या पार्श्वभूमीवर आणि 2024 नंतर पवार – मुलायम – लालू – ममता – केसीआर या सर्वांच्या घराणेशाहीची होणार आहे. याला फारसे कोणी अपवाद राहणार नाही. या गंभीर गोष्टीची शरद पवार यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्याला पुरती जाणीव झाली आहे आणि या जाणिवेतूनच एक अखेरचा प्रयत्न म्हणून पवार मोदींशी आपली जवळीक पुन्हा एकदा एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करत आहेत.
2024 मोदीच येण्याची अप्रत्यक्ष कबूली
पवारांची पुण्याच्या पत्रकार परिषदेतली बचावत्मक भूमिका ही त्याचेच निदर्शक आहे. म्हणूनच पवारांनी समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर उत्तर देताना मधेच 33% महिला आरक्षणाचा मुद्दा उकरून काढला आणि आपण पंचायत समित्या, जिल्हा परिषदा महापालिका इथपर्यंतच महिलांना 33% आरक्षण देऊ शकलो, याची कबुली देऊन मोदींकडेच विधिमंडळ आणि संसदेतील महिला आरक्षण मागितले. ही पवारांची 2024 च्या निवडणुकीत मोदी सरकारच येणार असल्याची अप्रत्यक्ष कबुली होती… आणि हेच पवार देशातील विरोधी ऐक्याचे अनेकांपैकी एक शिल्पकार आहेत…!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App