विशेष प्रतिनिधी
नागपूर : दोनच निवडणुकीत पराभूत झाल्यावर काँग्रेस निराशेच्या गर्तेत का गेली??, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान झाल्यानंतरही काँग्रेस कार्यकर्ते म्हणावे तसे पेटून उठले नसल्याची खंत काँग्रेसचे नेते माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी भाजपची देखील स्तुती केली. ते सतत 60 वर्षे हरल्यानंतरही निराश झाले नाहीत. 2 खासदारांपासून सुरुवात करून ते आता सत्तेवर पोहोचल्याचा दाखलाही त्यांनी दिला. अकोल्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मग काँग्रेस एक-दोन निवडणुका हरल्यानंतर निराशेच्या गर्तेत का गेली??, असा सवाल करून आपण काँग्रेस कार्यकर्त्यांमधील निराशा झटकण्यासाठी लवकरच संपूर्ण विदर्भात दौरा करणार असल्याचे प्रा. वसंत पुरके यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूकांमध्ये महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाल्यानंतरही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात वाद होत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी तुटते की राहाते असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर पुरके यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना शालजोडीतले दिले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांचा निकालात महाविकास आघाडीला मोठे अपयश आले आहे. महाविकास आघाडीचा खेळ 50 जागातच आटोपला. महाविकास आघाडीत शिवसेना ( उबाठा ) पक्षाला 20 जागा, काँग्रेसला 16 जागा तर शरद पवार राष्ट्रवादी गटाला 10 जागा मिळाल्या. या दारुण पराभवानंतर काँग्रेस आत्मचिंतन करायला तयार नाही असं वातावरण आहे. पण तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना आजही आपण सत्तेत असल्याचे वाटते आहे. काँग्रेस कार्यकर्ते सुस्तावले आहेत. निवडणुकीतील पराभवानंतरही ते पेटून का उठत नाहीत??, असा सवाल पुरके यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App