‘वारीतल्या भगव्या पताक्याचा राहुल गांधी आणि शरद पवारांना इतका द्वेष का? भाजपने नेमका सवाल!

Why do Rahul Gandhi and Sharad Pawar hate the saffron flag in Wari so much BJP asked

‘हिंदूद्वेषी आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना वारीतला रामकृष्ण हरीचा जयघोष रुचलाच नसता…’असा टोलाही लगावला आहे. Why do Rahul Gandhi and Sharad Pawar hate the saffron flag in Wari so much BJP asked

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आषाढी एकदशी निमित्त पंढरपुरला जाणाऱ्या वारीत यंदा शरद पवार आणि राहुल गांधी हे दोघेही सहभागी होणार असल्याचं, माध्यमांनी काही दिवसांपूर्वी दाखवलं होतं. यावरून बरीच चर्चा आणि मोठमोठ्या बातम्याही दिल्या गेल्या. मात्र पंढरपूरची आषाढी वारी झाली, तरीही हे दोन्ही नेते काही वारीत कुठं दिसले नाहीत, यावरून आता भाजपने चांगलाच समाचार घेतला आहे.

भाजपने म्हटलं आहे की, ‘शेवटी ते वारीला आलेच नाही…वारीतल्या भगव्या पताक्याचा राहुल गांधी आणि शरद पवारांना इतका द्वेष का? शरद पवार आणि राहुल गांधी यांचे जे काही थोडे खासदार अपप्रचारमुळे निवडून आले… आणि विशेष व्होट बँक नाराज होईल या भितीने दोघांनी वारीत येण्याचे टाळले.’



तसेच ‘यापूर्वी विठुरायची मूर्ती नाकारलेल्या राहुल गांधीने वारीचे आमंत्रण स्वीकारून देखीलही वारीत सहभागी झाला नाही, त्यामुळे त्याने पुन्हा एकदा वारकऱ्यांचा, परंपरेचा अपमान केला. हिंदू धर्म ज्यांचा चेष्टेचा विषय असतो अशा शरद पवारांना यंदा वारी आठवली, मात्र आपल्या सवयीप्रमाणे त्यांनी शेवटी काढता पाय घेतला. शेवटी आमचे तुकोबाराय म्हणालेच आहेत येऱ्यागबाळ्याचे काम नोहे.’ असंही भाजपने सुनावलं आहे.

याशिवाय, ‘वारीतली भगवी पताका खांद्यावर घेण्यासाठी पाठीशी पुण्याई आणि विठूरायाबद्दलची आस्था हवी, तुम्ही माध्यमांना हाताशी धरून वारीत सहभाग घेण्याच्या वावड्या उठवल्या खऱ्या मात्र तुमची पुण्याई कमी पडली. गेली अनेक शतके वारीची ही परंपरा चालत आली आहे. लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी तितक्याच तन्मयतेने दरवर्षी येत असतात. हिंदूद्वेषी आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना वारीतला रामकृष्ण हरीचा जयघोष रुचलाच नसता…’ असा टोलीही लगावला आहे.

Why do Rahul Gandhi and Sharad Pawar hate the saffron flag in Wari so much BJP asked

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात