देशद्रोही कोण??, कोणाबरोबर चहा पिणार होता??, उद्धव ठाकरेंचे आव्हान; नवाब मलिकांचे नाव घेऊन मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

प्रतिनिधी

मुंबई : देशद्रोही कोण? तुम्ही कुणाबरोबर चहा पिणार होतात?, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले, पण आपल्या विरुद्ध विधान परिषदेत मांडलेल्या हक्कभंग प्रस्तावाला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक यांचे नाव घेऊन उद्धव ठाकरेंचा हल्ला परतवून लावला. त्याचवेळी त्यांनी अजितदादांनाही जबरदस्त टोला हाणला. Eknath shinde targets Uddhav Thackeray and ajit Pawar over Nawab Malik issue

कसबा पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार घातल्याच्या मुद्द्याचा उल्लेख केला. देशद्रोह्यांबरोबर चहा पिणे टळले. बरे झाले, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली होती. या प्रतिक्रियेवरूनच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सवाल केला होता. देशद्रोही कोण?, तुम्ही कुणाबरोबर चहा पिणार होता?, याचा खुलासा करा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. मात्र, या आव्हानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेतील हक्कभंग ठरावाच्या निमित्ताने मुकाबला केला.

विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध “देशद्रोही” या शब्दावरून हक्कभंग आणला होता. मात्र त्या हक्कभंग प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट नवाब मलिक यांचे नाव घेतले आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला. ज्या नवाब मलिक यांचे दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी मनी लॉन्ड्रिंगचे संबंध आहेत, त्या नवाब मलिक यांना मी देशद्रोही म्हणलो होते आणि त्यांचा राजीनामा घ्या, असे मी त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. जर संजय राठोड यांचा राजीनामा होऊ शकतो नवाब मलिकांचा का नाही??, असा सवाल मी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना केला होता. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा मागण्याची हिंमत दाखवली नाही. त्यामुळेच मी नवाब मलिक यांना देशद्रोही म्हणालो होतो आणि आजही मी त्या वक्तव्यावर कायम आहे असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला.



अजितदादा आम्हाला महाराष्ट्रद्रोही म्हणाले होते. आम्ही काय महाराष्ट्रद्रोह केला?? 2019 मध्ये जनतेने शिवसेना – भाजप महायुतीला कौल दिला होता. पण जनतेच्या कौलाच्या विरोधात जाऊन शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आणि काँग्रेसचे सरकार तुम्ही बनवले होते आणि आम्ही जनतेने दिलेल्या कौलाचा मान राखून नवीन सरकार बनवले, हा महाराष्ट्रद्रोह झाला काय??, असा परखड सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रद्रोही म्हणून अजितदादांनी सुरुवात केली आणि म्हणून मी नवाब मलिक यांना देशद्रोही म्हणालो, असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला. नवाब मलिक यांना देशद्रोही म्हणणे गुन्हा असेल, तर तो मी 50 वेळा करेन, असे आव्हानही एकनाथ शिंदे यांनी दिले.

एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेतल्या उत्तरात दाऊद इब्राहिम आणि अनिस इब्राहिम शेख, सरदार खान यांची नावे घेऊन त्यांना झालेल्या शिक्षेचा उल्लेख केला. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात त्या सगळ्यांना शिक्षा झाल्या आहेत आणि दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्याशी गोवावाला कंपाऊंडच्या जमिनीचा गैरव्यवहार करण्यासाठी नवाब मलिक यांनी मनी लॉन्ड्रिंग केले आहे. त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध हे दहशतवाद विरोधी कलमातले खटले दाखल आहेत, याची आठवण सभागृहाला करून दिली. नवाब मलिक यांना पाठीशी घालण्यासाठी अजूनही तुम्ही तयार आहात का??, असा परखड सवाल एकनाथ शिंदे यांनी अंबादास दानवे यांना केला.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना देशद्रोही कोण?? तुम्ही कुणाबरोबर चहा पिणार होतात??, याचा खुलासा करण्याचे आव्हान दिले खरे, पण त्याचेच निमित्त करून मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत नवाब मलिक यांचे नाव घेऊन थेट राष्ट्रवादीलाही लक्ष्य करून दणदणीत प्रत्युत्तर दिले.

Eknath shinde targets Uddhav Thackeray and ajit Pawar over Nawab Malik issue

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात