प्रतिनिधी
मुंबई : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेच्या मागणीसाठी रस्त्यावर नेमके उतरवले कोणी? विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे नेमके कोण आहे?, यासंदर्भात चौकशीचे आदेश महाराष्ट्राच्या ठाकरे – पवार सरकारमधील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.Who took the students down the street ?; Home Minister Valse Patil’s inquiry order, but what about the caning of students
विद्यार्थ्यांची परीक्षाच नको ही मागणी मान्य करता येणार नाही. परीक्षा कमी गुणांची घेता येऊ शकते. या मुद्यावर चर्चा होऊ शकते. नोटीस न देता आंदोलन करणे बरोबर नाही. शिवाय ऑनलाइन परीक्षेच्या मुद्द्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरण्याची गरज होती का?, असा सवाल दिलीप वळसे-पाटील यांनी केला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्यासाठी नेमके कोणी भडकावले? याची चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. मात्र आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराबद्दल सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त होत असताना त्या मुद्द्यावर मात्र गृहमंत्र्यांनी मौन बाळगले आहे.
ऑनलाइन परीक्षेसाठी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांचा आंदोलनावर पोलिसांनी मुंबईतील धारावीत लाठीमार केला. संपूर्ण महाराष्ट्रात हा मुद्दा राजकीयदृष्ट्या पेटला असून सोशल मीडियावर त्याचे जोरदार पडसाद उमटले आहेत. अल्पवयीन विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केलाच का? त्यांना आंदोलनाची पूर्वकल्पना कशी आली नाही?, असे संतप्त सवाल सोशल मीडियावर करण्यात येत आहे. या सवालावर मात्र उत्तर गृहमंत्र्यांनी दिले नाही.
दहावी आणि बारावी विद्यार्थी परीक्षा ऑनलाईन घ्यावे या मागणीसाठी मुंबईत विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले. केवळ मुंबईच नाही तर नागपूर, औरंगाबाद, अकोला आणि उस्मानाबाद येथे विद्यार्थी याच मागणीसाठी रस्त्यावर उतरले. यासह धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घेराव घातला. विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेला विरोध दर्शवत गदारोळ केला. यावेळी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, याकारणाने परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.
मुंबईत विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्याच्या घराला घेराव घालत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गेल्या काही दिवसांपूर्वी परीक्षा ऑफलाईनच होणार आहे, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितल्यानंतर आज विद्यार्थ्यी त्याविरोधात आक्रमक झाले. शाळा ऑनलाईन असताना परीक्षा ऑफलाईन का? असा आक्रमक सवाल आंदोलक विद्यार्थ्यांनी केला. या मुद्द्यावर ठाकरे – पवार सरकारच्या अन्य मंत्र्यांनी तसे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उत्तर दिले नाही. कालच वर्षा गायकवाड यांनी परीक्षा ऑफलाईन आणि वेळापत्रकानुसार होणार असल्याचे सांगितले होते. परंतु हा निर्णय विद्यार्थ्यांना मान्य नाही. याप्रकरणी सोशल मीडियावर देखील विद्यार्थ्यांकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटली.
– प्रवीण दरेकर यांचा सरकारवर कटाक्ष
या आंदोलनावरून भाजपने सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे, या राज्यात लोकशाही राहिलेली नाही, मनाला येईल तेव्हा लाठीमार, मनाला येईल तेव्हा जेलमध्ये टाकायचे, मनाला येईल तेव्हा गुन्हे दाखल करायचे, असले सरकारचे धंदे सुरू असल्याचे टीकास्त्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोडले आहे. विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे पाप हे सरकार करतेय, अशी टीका दरेकरांनी केली आहे. यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App