नाशिक : शरद पवार आणि राहुल गांधींना 160 जागांची गॅरंटी दिली कुणी??; दोन माणसे भेटल्याची पवारांनी सोडली नवी पुडी??, असा सवाल शरद पवारांच्या आजच्या नागपूर मधल्या पत्रकार परिषदेमुळे समोर आला.
राहुल गांधींनी मतांच्या चोरी प्रकरणात निवडणूक आयोगाविरुद्ध प्रेझेंटेशन केल्यानंतर शरद पवार मी आज नागपूर मध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यांनी राहुल गांधींचे पूर्ण समर्थन केले. हे समर्थन करताना शरद पवारांनी मोठा राजकीय गौप्यस्फोट केल्याचे बोलले गेले. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका होण्याआधी शरद पवारांना म्हणे, दिल्लीत दोन माणसे भेटायला आली होती. त्यांनी शरद पवारांना महाराष्ट्रातल्या विधानसभांच्या 288 पैकी 160 जागा निवडून आणायची गॅरंटी दिली होती. याचा अर्थ 160 जागांवर मतदानात फेरफार करण्याची त्यांची गॅरंटी होती, असे पवार म्हणाले. त्या पाठोपाठ पवारांनी त्या दोन माणसांची राहुल गांधींशी भेट घालून दिली. या दोन माणसांनी राहुल गांधींना देखील 160 जागा निवडून आणायची गॅरंटी दिली. पण त्यानंतर राहुल गांधी आणि पवार यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी निवडणूक आयोगावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे आपला “तो रस्ता” नाही. आपण लोकांकडे जाऊन आशीर्वाद मागू या, असे आमच्यात ठरले, असे पवार म्हणाले. निवडणुका असल्या की अशी माणसे भेटायला येतात, अशी मखलाशी देखील त्यांनी केली.
पवारांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली. राहुल गांधींनी कर्नाटक मधल्या मतांच्या चोरी संदर्भात भले मोठे प्रेझेंटेशन करून आकडेवारी सादर केली. त्यासाठी त्यांनी महादेवपुरा मतदारसंघाचे उदाहरण घेतले, पण राहुल गांधींना मालेगावातले उदाहरण दिसले नाही. निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितल्यानंतर ते मात्र करणे त्यांनी नाकारले.
– पवारांनी माणसांची नावे सांगितली नाहीत
त्या उलट आज शरद पवारांनी नागपूर मधल्या पत्रकार परिषदेत कुठलेही प्रेझेंटेशन केले नाही. महाराष्ट्र मध्ये मतांची चोरी कशी झाली किंवा कुठे झाली याविषयी नेमकेपणाने भाष्य केले नाही पण त्यांनी फक्त दोन माणसे मला भेटायला आली होती आणि त्यांनी मला 160 जागा निवडून आणायची गॅरंटी दिली होती. त्या दोन माणसांची मी राहुल गांधी यांच्याशी भेट घालून दिली, पण आम्ही दोघांनी आपला तो रस्ता नाही. आपण लोकांकडे जाऊन आशीर्वाद मागू या, असे आमच्या ठरले एवढेच सांगितले. पण पवारांनी त्या दोन माणसांची नावे पत्रकार परिषदेत सांगितली नाहीत. त्या दोघांचा ठाव ठिकाणा सांगितला नाही. किंबहुना दोन माणसांची कहाणी सांगून पवार पत्रकार परिषदेतल्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळले. महाराष्ट्राच्या माध्यमांनी दोन माणसांभोवतीच्या बातम्या खूप रंगविल्या. पण त्यामुळे पवारांना भेटलेली माणसे खरीच होती की पवारांनी माणसे भेटल्याची पुडी सोडली??, याविषयी दाट शंका तयार झाली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App