प्रतिनिधी
मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर आरोप करताना ज्यांची नावे घेतलीत, ते सरदार शहा वली खान आणि सलीम पटेल हे नेमके आहेत तरी कोण…Who are Sardar Shah Wali Khan and Salim Patel? What is the crime against them
सरदार शहा वली खान हा 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातला गुन्हेगार आहे. त्याला जन्मठेप झाली आणि ती सर्वोच्च न्यायालयाने कायम केली. सध्या तो कारागृहात आहे. दाऊदचा भाऊ टायगर मेमनच्या फायरआर्म ट्रेनिंगमध्ये हा सामील झाला होता. मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई महापालिकेच्या इमारतीत बॉम्ब कुठे ठेवायचा, याची रेकी त्याने केली होती. टायगर मेमनच्या घरी बॉम्बस्फोटाचे कारस्थान शिजले. त्या सर्व मिटिंगला हा उपस्थित होता.
सरदार शहा वली खानला काय होणार आहे, याची संपूर्ण माहिती होती. माहीममध्ये अल हुसैनी बिल्डींग या टायगर मेमनच्या घरी गाड्यांमध्ये आरडीएक्स त्यानेच भरले. त्याच्यावर टाडा कायद्याने गुन्हा शाबित झाला. माफीचे साक्षीदार आणि इतर गुन्हेगारांनी याबाबत प्रत्यक्षदर्शी पुरावा दिला, त्यामुळे त्याला जन्मठेप झाली.
सलीम पटेल
दुसरी व्यक्ती ही मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल हा आहे. तो हसीना पारकरचा सहकारी आणि फ्रंटमॅन. तिच्यासोबत याला 2007 मध्ये पकडले होते. त्याला समोर करून संपत्ती बळकाविण्याचे काम ती करायची. या दोघांकडून नवाब मलिक यांच्या कंपनीने जागा खरेदी केली आहे.
यापैकी सलीम पटेलशी व्यवहार झाला होता. पण तो गुन्हेगार आहे की फरार आहे, हे त्यावेळी माहिती नव्हते, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
तर सरदार वली खान याचा उल्लेख करत याचा संबंध आमच्याशी जोडण्याचा प्रकार चुकीचा असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. त्या कंपाउंडमध्ये वली खानचे घर आजही आहे. त्याचे वडील गोवावाला कुटुंबीयांच्या वॉचमेनप्रमाणे काम करत होते.
जेव्हा आम्ही गोवावालाकडून मालमत्ता घेतली, तेव्हा ३०० मीटरपर्यंत सरदार वली खान यांनी आपले नाव चढवले होते. जेव्हा मालमत्तेची नोंदणी करायला गेलो तेव्हा आम्ही ३०० मीटरचे पैसे देऊन त्यांनी त्यांचा हक्क निर्माण केला होता तो विकत घेतला. आजही आमच्या घराच्या मागे ती सर्व जागा आहे. आमचे गोदामही तेथे आहे. जी पुढे इमारत आहे त्या इमारतीत आमची चार दुकाने आहेत.
ती भाड्याने दिलेली आहेत. तेव्हाही ती होतीच. मालमत्ता घेतली तेव्हा गोवावाला इमारतीत ८ दुकाने आणि ८ घर ही सर्व मालमत्ता आमची झाली. यात कोणत्याही पद्धतीने अंडरवर्ल्डच्या दबावाने किंवा बॉम्बस्फोटाशी संबंधित व्यक्तीकडून आम्ही ही मालमत्ता खरेदी केलेली नाही, असा दावा मलिक यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App