Understand Geo politics : ज्यावेळी अमेरिका आणि चीन उतरले पाकिस्तानच्या बचावात, त्याचवेळी काँग्रेस आणि विरोधक मोदी सरकारला घेरायच्या बेतात!!

Understand Geo politics

नाशिक : “ऑपरेशन सिंदूर” मधून भारताने पाकिस्तानच्या लष्करी आणि हवाई दल तळांना प्रचंड नुकसान पोहोचविले असताना, ज्यावेळी अमेरिका आणि चीन पाकिस्तानच्या बचावासाठी वेगवेगळ्या मार्गांनी उतरले, नेमके त्याच वेळी काँग्रेस आणि बाकीच्या विरोधकांनी मोदी सरकारला घेरायचे ठरविले. हे चित्र आज 11 मे 2025 रोजी समोर आले.

Operation sindoor मध्ये भारताने precision and professional attack करून पाकिस्तानला ठोकले. 100 + दहशतवादी मारले. पाकिस्तान मधले 7 मोठे हवाई तळ उद्ध्वस्त केले. भारतीय हवाई दलाने आत्तापर्यंतची टार्गेट्स पूर्ण केली. पण यापुढचे भारताचे टार्गेट पाकिस्तान मधली atomic installations असू शकतात हे लक्षात येताच पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेने (ISI) अमेरिकेकडे मदतीसाठी धाव घेतली. भारताला समजावून सांगण्याची गळ घातली. भारताने पाकिस्तानच्या atomic installations वर हल्ले चढविले, तर पाकिस्तानचे अस्तित्वच मिटेल किंवा पाकिस्तानची अण्वस्त्रे (atomic arsenals) दहशतवाद्यांच्या ताब्यात जातील, अशी भीती पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेने अमेरिकेपुढे उभे केली. त्यामुळे अमेरिकेने भारताला “समजावून” सांगितले. त्याचवेळी चीनने भारत आणि पाकिस्तान मधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संयम राखण्याचे आवाहन केले. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी संपर्क साधला.



ऑपरेशन सिंदूर मधून भारताने त्याची सुरुवातीची टारगेट्स पूर्ण केलीत. त्यामुळे शस्त्रसंधी करायला हरकत नाही, असे तिन्ही देशांनी अप्रत्यक्षपणे भारताला सूचविले. दक्षिण आशियातल्या Geo politics कठोर वास्तव लक्षात घेऊन भारताने firing आणि military action थांबवायचे मान्य केले. पण पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, तरी देखील अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांना एकाच तागडीत तोलून दोन्ही देशांची व्यापार वाढविण्याची लालूच दाखविली.

या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने एक ट्विट करून भारताने ऑपरेशन सिंदूर थांबविले नसल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वरिष्ठ पातळीवरील बैठकांचा सिलसिला सुरू ठेवला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लखनऊ येथे ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणाली उत्पादन कारखान्याचे उद्घाटन केले. याच ब्रह्मोस क्षेपणास्त्राने पाकिस्तानचे हवाई तळ उद्ध्वस्त केले. याच क्षेपणास्त्राचे उत्पादन वाढवायला भारताने आजपासूनच सुरुवात केली.

– काँग्रेसचा राजकीय मुहूर्त

इतके सगळे होत असताना काँग्रेस आणि विरोधकांनी मात्र आजचाच “राजकीय मुहूर्त” शोधून मोदी सरकारला घेरायचे ठरविले. कपिल सिब्बल आणि सचिन पायलट यांनी पत्रकार परिषदा घेऊन मोदी सरकारकडे संसदेचे विशेष अधिवेशन बोलवायची मागणी केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींना आधी लिहिलेले पत्र रिपीट केले. राहुल गांधींनी ते पत्र री ट्वीट केले.

पी. चिदंबरम आणि शशी थरूर यांनी मोदी सरकारच्या संयमी परराष्ट्र धोरणाची स्तुती केली, पण काँग्रेसने नेमकी आजच इंदिरा गांधींची आठवण काढून त्यांनी 1971 मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती केली याची आठवण मोदींना करून दिली. भारताने ceasefire कोणत्या अटींवर मान्य केले??, असा सवाल असा सवाल ओवैसी यांनी आजच मोदींना केला.

तथाकथित ceasefire आणि त्याचे पाकिस्तानी केलेले उल्लंघन या पार्श्वभूमीवर मोदी सरकार नवी precision strategy अंमलात आणत असताना काँग्रेस आणि विरोधकांना संसदेच्या विशेष अधिवेशनात तिच्याविषयी चर्चा हवी आहे. जी precision strategy केवळ अंमलात आणायची असते, ज्यावर फारशी सार्वजनिक चर्चा करायची नसते, तिच्याबद्दलच काँग्रेस आणि बाकीच्या विरोधकांना आत्ताच “उत्सुकता” निर्माण झाली आहे म्हणूनच त्यांनी “लोकशाही” तत्त्वानुसार त्यावर संसदेच्या विशेष अधिवेशनात चर्चा मागितली आहे. या सगळ्याचा नेमका अर्थ अगदी between the lines न वाचता येणाऱ्याला ही समजता येण्यासारखा आहे!!

While US and China saved Pakistan, Congress wants to encircle Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात