समोर अजितदादांचे भाषण सुरू, तरीही माणिकराव कोकाटे मोबाईल पाहण्यात मग; नवाब मलिक + धनंजय मुंडे यांना पहिल्या रांगेत स्थान!!

Ajit Pawar

नाशिक : समोर अजितदादांचे भाषण सुरू, तरीही माणिकराव कोकाटे मोबाईल पाहण्यात मग; नवाब मलिक + धनंजय मुंडे यांना पहिल्या रांगेत स्थान!!, असे चित्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार – खासदारांच्या बैठकीत पाहायला मिळाले.

माणिकराव कोकाटे यांना विधिमंडळाच्या सभागृहात मोबाईल पाहण्याची शिक्षा मिळाली. त्यांना कृषी खाते गमवावे लागले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्यांचा पिच्छा पुरवला. माणिकराव कोकाटे यांनी कृषी खाते गमावल्यानंतर रोहित पवारांवर बदनामीचा खटला दाखल केला. माणिकराव कोकाटे यांच्या मोबाईल प्रकरणामुळे अजितदारांच्या राष्ट्रवादीची गोची झाली. तरी देखील माणिकराव कोकाटे सुधारल्याचे दिसले नाही अजित पवारांनी घेतलेल्या आमदार खासदारांच्या बैठकीत माणिकराव कोकाटे पहिल्या रांगेत बसले होते परंतु अजित पवारांचे भाषण सुरू असताना सुद्धा ते भाषण ऐकण्याऐवजी मोबाईल पाहण्यातच रमल्याचे दिसून आले. त्यांचा तसा फोटो दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्या नव्हे तर, अजित पवारांच्याच सोशल मीडिया हँडलवर आढळून आला.



– मलिक + मुंडे पहिल्या रांगेत

अजित पवारांनी आमदार खासदारांच्या याच बैठकीत नवाब मलिक आणि धनंजय मुंडे यांना पहिल्या रांगेत स्थान दिले होते ते पहिल्या रांगेतल्या कोचांवर एकमेकांच्या शेजारीच बसले होते. दाऊद इब्राहिमच्या गँगस्टरशी केलेल्या मनी लॉन्ड्रिग मुळे नवाब मालिकांना मंत्रीपद गमवावे लागले. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने तिकीट देऊन सुद्धा पराभव पत्करावा लागला. त्यांचे प्रवक्ते पद गेले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये येऊन सुद्धा त्यांचा फार मोठा राजकीय फायदा होऊ शकला नाही. ते फक्त तुरुंगातून जामीनावर बाहेर आले. पण अजित पवारांनी पक्षाची बिलकुल शक्ती नसलेल्या मुंबईची जबाबदारी नवाब मलिक यांच्यावर सोपविली. त्यानंतर आज त्यांना पक्षाच्या आमदार खासदारांच्या बैठकीत पहिल्या रांगेत स्थान दिले.

संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांना मंत्रीपद गमवावे लागले. फडणवीस सरकारची पूर्ण बदनामी झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी नाईलाजास्तव मंत्रीपद सोडले. पण न्यायालयाने किरकोळ क्लीन चीट दिल्यानंतर पुन्हा मंत्रीपद मिळवण्यासाठी गडबड गोंधळ सुरू केला. ठिकठिकाणी भाषणे करून अजितदादांची आणि फडणवीस सरकारची गोची केली. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत अजित पवारांनी त्यांना पहिल्या रांगेत स्थान दिले.

– संग्राम जगताप यांना भरला दम

याच बैठकीत अजित पवारांनी संग्राम जगताप यांना सुद्धा दम भरला. राज्यात वेगवेगळ्या तणावाचे वातावरण असताना एखाद्या समुदायाविरुद्ध बोलणे चुकीचे आहे पक्षाच्या ध्येय धोरणांशी ते विसंगत आहे कुठल्याही लोकप्रतिनिधीने असे बोलू नये. ते पक्ष सहन करणार नाही. प्रसंगी कठोर कारवाई करेल, असे भाषण अजितदादांनी करून संग्राम जगताप यांना दम भरला. पण असा दम भरण्याचा उल्लेख त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वर केला नाही. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि संघटनेतील रचनात्मक बदलांवर चर्चा करण्यासाठी आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत झाल्याचे त्यांनी नमूद केले.

While Ajit Pawar was speaking, Manikrao kokate engaged in mobile surffing

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात