पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात कोणता उमेदवार भाजप उभा करणार?


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : विधानसभा परिषदेच्या निवडणुकीची तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीचा ज्वर आताशा काहीसा चढू लागला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यक्षेत्रात होणारी निवडणूक ही प्रतिष्ठेची असणारच. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपने रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलावली होती.

Which candidate will BJP field against Minister Satej Patil?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी आमदार सुरेश हळवणकर, अमल महाडिक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे इत्यादी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आमदार आवाडे आणि कोरे यांनाही या बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे अशी चर्चा आहे.

तर पालक मंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात कोणता उमेदवार उभा करण्याचा? यासाठी ही बैठक होणार आहे. माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शौमिका महाडिक तसेच जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, प्राचार्य जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.


या कारणासाठी सोमय्यांना कोल्हापुरात येण्यास बंदी घातली होती! सतेज पाटील यांनी व्यक्त केले मत


स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाविकास आघाडीचे प्रभुत्व आहे. कारण काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या मतांची आकडेवारी ही भक्कम असणारच आहे. त्यामुळे भाजपकडून कोणता उमेदवार रिंगणात उतरणार यावर सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्याच्या राजकारणात भाजप आमदार प्रकाश आवाडे आणि जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्या नावाची चर्चा जोरात आहे. आवाडे यांच्याकडे इचलकरंजी, हुपरी तर कोरे यांच्याकडे पन्हाळा, मलकापूर नगरपालिकेतील सदस्यांचा मोठा पाठिंबा आहे. गडहिंग्लजमध्ये जनता दलाचे प्रभुत्व आहे. भाजप, महाडिक गट, आवाडे आणि कोरे एकत्र आले तर मात्र ही निवडणूक चुरशीची होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

निवडणुका जाहीर झाल्यापासून आमदार सतेज पाटील यांनी तालुका आणि नगरपालिका सदस्यांची वैयक्तिकरीत्या भेट घेऊन प्रचार करण्यास सुरूवात केली आहे.

Which candidate will BJP field against Minister Satej Patil?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात