विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिशा सालियन आणि अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या बाबतीत जी घटना घडली आहे, त्यामध्ये राहुल कनालचा तर हात नव्हता ना? सीडीआर चेक करायला हवे. 8 जूनला दिशाचा मृत्यू झाला त्या रात्री हा राहुल कुठे होता, याचा तपास करायला हवा. असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केले आहे.Where was Rahul Kanal on the night of Disha Salian’s death, Nitesh Rane’s question
नितेश राणे यांनी राहुल कनालबाबात अनेक खुलासे केले आहेत. जनतेचा पैसै कोण चोरी करत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, हा डेंटिस्टचा मुलगा कसा काय इतके पैसे कमावतो, राहुल कनाल हा आदित्य ठाकरे यांच्या नाईटलाईफ गँगचा भाग आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
ते म्हणाले की, मुंबईतले हर्बल हुक्का पार्लर हे राहुल कनालचे आहे, तसेच कॅफे बांद्रा नावाचे त्याचे एक रेस्टॉरंट देखील आहे, संध्याकाळी सात नंतर तो कुणासोबत बसतो, त्याला शिर्डी ट्रस्टवर का पाठवले गेले. राहुल कनालकडे नेमका कुणाचा पैसा आहे याचा तपास व्हायला हवा.
दिशा सालियन प्रकरणात नारायण राणे यांनी एका पत्रकार परिषदेत खळबळजनक खुलासा केला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, दिशाची आत्महत्या नव्हे तर तिची हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे देखील भाष्य नारायण राणे यांनी केला होता. त्यानंतर दिशाची कुटुंबियांनी राणे पित्रा पुत्रांविरोधात मालवणी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. सध्या या प्रकरणी नारायण राणे आणि नितेश राणे यांनी चौकशी सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App