महिला प्रत्येक क्षेत्रात आल्यास देश प्रगतीपथावर जाईल- कपिल देव


भारत देशातील महिला या खूप मेहनती ,कर्तुत्ववान आहेत त्यांच्याकडे विविध प्रकारची गुणवत्ता आहे त्या जर विविध क्षेत्रात पुढे आल्या तर भारत देश प्रगतीचे शिखर गाठले असा विश्वास जागतिक क्रिकेटपटू कपिल देव यांनी व्यक्त केला आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे – भारत देशातील महिला या खूप मेहनती ,कर्तुत्ववान आहेत त्यांच्याकडे विविध प्रकारची गुणवत्ता आहे त्या जर विविध क्षेत्रात पुढे आल्या तर भारत देश प्रगतीचे शिखर गाठले असा विश्वास जागतिक क्रिकेटपटू कपिल देव याने पुण्यातील फिक्कीच्या महीला विंग तर्फे आयोजित महिला उद्योजिकाना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित एका परिषदेत व्यक्त केला .

When Women’s participation in every field then country will top position of development says ex crickter Kapil Dev

पुढे ते म्हणाले की ,देशासाठी क्रिकेट खेळणे हे कधीच दबावाचे वाटले नाही तर ते कायमच आनंददायी आणि प्रेरणादायी होते. जीवनात यशस्वी होण्यासाठी कायम जिंकण्याचा विचार करा, स्वतःवर प्रेम करा, प्रामाणिकपणे काम करा जीवनाच्या खेळात नक्कीच जिंकाल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी फिक्की महिला विंगच्या वतीने क्रिकेटपटू कपिलदेव यांनी पुण्यात मुक्त संवाद साधला. यावेळी कपिल देव यांचे सहकारी क्रिकेटपटू बलविंदर सिंग संधू,फिक्की महिला विंगच्या अध्यक्षा नीलम शेवलेकर, वरिष्ठ उपअध्यक्षा रेखा मगर, पिंकी राजपाल , सोनिया राव यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी उद्योजिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी कपिल देव यांनी १९८३ मध्ये कर्णधार असताना विश्वचषक जिंकलेल्या आठवणींना उजाळा दिला. क्रिकेटच्या खेळात सोबत जीवनातील चढ-उतार तसेच विश्वचषक जिंकन्यापर्यंतचे अनेक किस्से त्यांनी सांगितले. खेळांमध्ये प्रामाणिकपणा आवश्यक आहे.सध्या सर्वजण दबावा खाली आहोत असे सांगत असतात .परंतु कोणतीही गोष्ट प्रेशर ऐवजी प्लेझर म्हणून समजल्यास नक्कीच यश मिळते. मी एकत्र कुटुंब पद्धतीतून आल्यामुळे मला चांगले संस्कार मिळाले.

सर्वांची काळजी, सगळ्यांना सोबत घेऊन जाणे यामुळे मी संघाचे चांगले नेतृत्व करू शकलो. कोणत्याही परिस्थितीत माणूस यशस्वी होऊ शकतो. मी अत्यंत गरीब कुटुंबातून आलेलो आहे. आता मोठ्या प्रमाणावर साधने उपलब्ध आहेत परंतु आमच्या काळात पैसे मिळत नसत त्यामुळे फसवणूक करणे दूरच होते. सगळ्या व्यक्ती सारख्या असू शकत नाहीत. एखादी व्यक्ती चुकीचे असू शकते त्यामुळे सर्वांना वाईट समजू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर प्रेम करा. नक्कीच तुम्ही जिंकू शकता. खेळात जिंकणे किंवा कोणतीही गोष्ट मिळवणे यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न यातून यश नक्की मिळते.

When Women’s participation in every field then country will top position of development says ex crickter Kapil Dev

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात