उद्धव ठाकरे यांच्या आजच्या मराठवाडा दौऱ्यापूर्वी आणि दौऱ्यानंतर राजकारण बेरजेचं की वजाबाकीचं?

विशेष प्रतिनिधी

संभाजीनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे ऐन दिवाळीत आज रविवारी 23 ऑक्टोबर 2022 रोजी संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. पण त्यांच्या या दौऱ्यापूर्वीच त्यांच्या पक्षात बेरजेचे राजकारण सुरू झाले आहे, की वजाबाकीचे??, हा प्रश्न पडतो आहे. What kind of politics Uddhav Thackeray is playing??, inclusive or excluding??

कारण शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी मोठे फूट पाडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्री मध्ये विविध नेत्यांना पदाधिकाऱ्यांना बोलवून सगळीकडे नव्या नियुक्त्या केल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे पक्षाला नवे नावही मिळवले. पण त्यानंतरही शिवसेनेतली खदखद संपलेली दिसत नाही. बीड जिल्ह्यातले नेते जयदत्त क्षीरसागर यांची पक्षातून हकालपट्टी, शिवसेनेच्या प्रवक्त्या दिपाली सय्यद पक्षामध्ये नाराज, मिलिंद नार्वेकर यांच्या नाराजीच्या माध्यमांमधल्या बातम्या या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या, तर शिवसेनेतील फुटी नंतर देखील उद्धव ठाकरे यांनी जी केली डागडूजी केली ती पुरेशी ठरलेली दिसत नाही.



एरवी उद्धव ठाकरे यांची बाजू ते मुख्यमंत्री असताना प्रत्येक प्रश्नावर उचलून धरताना दिपाली सय्यद आघाडीवर होत्या. पण आता ज्यावेळी सुषमा अंधारे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश झाला आहे, तेव्हापासून त्या नाराज असल्याचे बातम्या माध्यमांमध्ये येत होते. काल तर त्यांनी आपला आवाज उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचू दिला जात नव्हता, असा गौप्यस्फोट करून आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली आहे. वर त्यांनी आपण कोणावरही नाराज नाही, असे स्पष्ट देखील केले आहे. पण आपला आवाज मातोश्री पर्यंत पोहोचू दिला जात नव्हता, हे त्यांचे वक्तव्य नेमके काय सांगते?? हा प्रश्न कायम आहे.

शिवाय उद्धव ठाकरे हे आज जरी ते संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत असले तरी त्यांच्या या दौऱ्यात संघटनात्मक पातळीवर ते कोणता निर्णय घेतात आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला कितपत मजबुती मिळवून देतात??, हा मुख्य प्रश्न आहे. मराठवाड्यात पावसाने थैमान घातले. या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणी पूर्वी प्रत्यक्ष शेतकरी बांधवांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे मराठवाड्यात येत आहेत असे सांगण्यात येते. त्यांचा दौरा शेतकरी संवादाच्या निमित्ताने होत असेलही. त्याचे काही फलित शेतकऱ्यांना मिळेलही पण त्यापलिकडे जाऊन त्यांच्या दौऱ्याचा राजकीय लाभ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना या पक्षाला संघटनात्मक पातळीवर किती होईल??, मराठवाड्यात संघटना मजबूत करण्यासाठी कोणते पाऊले टाकली जातील??, हे पाहणे महत्त्वाचे आहे.


Sambhajinagar : राज ठाकरेंची नुसती घोषणा; तरी शिवसेना नेत्यांना बाळासाहेबांच्या रेकॉर्ड सभेच्या आठवणी!!


उद्धव ठाकरे यांच्या संभाजीनगर दौऱ्यात ते बेरजेचे राजकारण करणार की शिवसेना या पक्षातील वजाबाकी कायम राहणार?? हा प्रश्न आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्यासारखे माजी मंत्री केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले म्हणून त्यांची हकालपट्टी होत असेल तर हे राजकारण बेरजेचे की वजाबाकीचे??, याचे उत्तर उद्धव ठाकरे यांच्या राजकीय कृतीनंतरच मिळणार आहे.

What kind of politics Uddhav Thackeray is playing, inclusive or excluding

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात