Sharad Pawar : मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे हात असल्याचा आरोपावर कायम्हणाले शरद पवार….

Sharad Pawar

विशेष प्रतिनिधी

 

नाशिक : Sharad Pawar : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे शरद पवारांचे समर्थक असल्याचा आरोप अनेकांकडून वारंवार केला जात आहे. या आरोपांवर शरद पवार गटाच्या आमदारांनी आणि प्रवक्त्यांनी यापूर्वी अनेकदा प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र, खुद्द शरद पवार यांनी या मुद्द्यावर यापूर्वी कधीही भाष्य केले नव्हते. आज, नाशिक येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली.

सध्या, नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी आक्रमक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाने आज नाशिकमध्ये एकदिवसीय शिबिराचे आयोजन केले आहे. उद्या, शेतकऱ्यांच्या समस्यांवर आणि सरकारच्या धोरणांवर आधारित शेतकरी आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे.या शिबिराच्या निमित्ताने शरद पवार आज नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना एकाने विचारले, “मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे तुमचा हात असल्याचा आरोप केला जातो, यावर काय सांगाल?” या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, “मनोज जरांगे यांच्या आंदोलनाशी माझा काडीमात्र संबंध नाही. हे सर्व आरोप तथ्यहीन आहेत. त्यामुळे यावर भाष्य करण्याची मला गरज वाटत नाही.”



दरम्यान, शरद पवार यांनी पुढे सांगितले की, सरकार हे कोणत्याही एका जातीचे किंवा धर्माचे नसावे. सरकारने सामाजिक एकजूट निर्माण करण्यासाठी काम करावे आणि सामाजिक सलोखा राखावा. सरकार व्यापक दृष्टिकोन ठेवणारे असावे. सामाजिक एकता टिकवण्यासाठी सर्व समाजांना एकत्र घेऊन विचार केला पाहिजे. एका समाजासाठी एक समिती आणि दुसऱ्या समाजासाठी दुसरी समिती असे न करता, सरकारने सर्वसमावेशक दृष्टिकोनातून विचार करावा, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करून सरकारला धारेवर धरले होते. जरांगे यांच्या ओबीसींमधील आरक्षणाच्या मागणीवर सरकारने आदेश जारी केला आहे. त्यांच्या आठ पैकी सहा मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मनोज जरांगे हे शरद पवारांचे समर्थक असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातील काही आमदार आणि मंत्र्यांकडून, तसेच ओबीसी आंदोलनातील काही नेत्यांकडूनही केला जात आहे. यावर आता खुद्द शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

What did Sharad Pawar say on the accusation that he was behind Manoj Jarange’s protest?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात