विशेष प्रतिनिधी
संगमनेर : या मातीतील प्रस्थापितांना करून टाकू ढेर, पुन्हा एकदा भगवा फडकावू जिंकू संगमनेर…!!, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मध्ये एल्गार केला.
ज्यांनी सत्तेच्या बळावर ४० वर्षे या संगमनेरवर राज्य केले आणि तरीही इथले मूलभूत प्रश्न सुटू शकले नाहीत, त्यांना हद्दपार करून शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ यांना आणि इतर सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी जाहीर प्रचार सभेत केले.
संगमनेर नगरपरिषदेची निवडणूक हाय प्रोफाईल झाली आहे. तिथे आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली आणि आमदार अमोल खताळ यांची भावजय सुवर्णा खताळ यांच्यात नगराध्यक्ष पदाची लढत आहे.
– एकनाथ शिंदे म्हणाले :
– संगमनेरकरांनी विधानसभा निवडणुकीत कमाल केली आणि अमोल खताळ निवडून आणले. आता तसाच चमत्कार पुन्हा करून दाखवायचा आहे. या निवडणकीतून काँग्रेसचा पंजा हद्दपार झाला असून, आता तो आपल्याला कायमचा हद्दपार करायचा आहे. या भागात आपले रुग्णालय चालावे, म्हणून सरकारी रुग्णालये तशीच ठेवली. अंतर्गत रस्ते खराब आहेत, प्रत्येक कामात भ्रष्टाचार केला, पण आता या सगळ्याची चौकशी आपण करू.
– संगमनेर मध्ये एमआयडीसी मंजूर करून तरुणांना काम मिळावे यासाठी थेट उद्योग मंत्री उदय सामंत यांना फोन करून दोन महिन्यात याबाबत कार्यवाही करण्यास सांगितले. तसेच शहरातील १०० बेडचे महिला आणि बाल रुग्णालय लवकरात लवकर सेवेत आणावे असे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना दिले. यासोबतच शहरातील शास्ती कर माफ करण्याबाबत कार्यवाही करू, जुनी घरे नियमित करू, ५०० स्क्वेअर फुटांवरील घरांना मोठ्या शहरांप्रमाणे मालमत्ता करात सवलत देऊ.
याप्रसंगी आमदार अमोल खताळ, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ, शिवसेनेचे सर्व उमेदवार तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि संगमनेरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App