प्रतिनिधी
मुंबई : आमची इमानदारीची औलाद असून, बेईमानीची औलाद नाही. एखाद्याला शब्द दिला, हातात हात दिला तर शेवटपर्यंत त्याचा हात सोडत नाही. पाठीत सुरा खुपसणारी आमची औलाद नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना आम्ही शब्द दिला आहे की, तुमच्यासोबत कुणी असेल किंवा नसेल, शेवटपर्यंत प्रामाणिकपणे असणार आहे, असे वक्तव्य शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांनी केले आहे. या वक्तव्यातून अस त्यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक लढवण्याचे सूचित केले आहे. We are not the descendants of those who pierce the back of the dagger; Vinayak Meten testifies to Fadnavis
आपल्याला हक्काची आमदारकी आता २०२४ ला मिळवायची आहे, असे संकेतही मेटे यांनी यावेळी दिले.
राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र या निवडणुकीपूर्वीच भाजपामध्ये नाराजी नाट्यावरून मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषद उमेदवार येथून डावलण्यात आल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर मेटे यांच्या वक्तव्याला अधिक महत्त्व आहे उमेदवारी मिळाली नाही म्हणून बडबडत बसायचं हे आमच्या बापजाद्यांनी शिकवलं नाही, असा टोलाही त्यांनी पंकजा मुंडे समर्थकांना लगावला आहे.
– मेटेंची फटकेबाजी
मेटे म्हणाले की, भाजपा नेते प्रवीण दरेकर यांचा ताफा काही येड्या लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. चांगल्या कामासाठी जाताना काही येडे लोकं आडवी येतच असतात. तसेच उमेदवारी मिळाली नाही म्हणून, नाराज होऊन लगेच बाजूला व्हायचं आणि काहीही बडबडत बसायचं, काहीही करायचं, काहीही उपटसुंभ उद्योग करायचे हे आमच्या बापजाद्यांनी शिकवलं नाही. दरम्यान मित्र जरी असले तरीही कशाला कुणाला काही मागयाचं. त्यामुळे त्या दिशेने आपल्यालाच काम करायचं आहे, असेही मेटे म्हणाले. या माध्यमातून त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App