भारत क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट इकॉनॉमीचे जागतिक नेतृत्व करेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ कन्वेन्शन सेंटरमध्ये ‘वेव्हज 2025’ या जागतिक समिटच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली.
मुख्यमंत्री म्हणाले, 1 ते 4 मे 2025 या कालावधीत मुंबईत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट – वेव्हज 2025’ चे भव्य आयोजन होणार आहे. हे आयोजन महाराष्ट्रासाठी विशेषतः मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, भारत क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट इकॉनॉमी चे जागतिक नेतृत्व करेल, असा मला ठाम विश्वास आहे.
या समिटमध्ये शंभरहून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, पाच हजारांहून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहे. विशेष म्हणजे हे समिट दरवर्षी मुंबईतच आयोजित होणार आहे. त्यामुळे मुंबईचे जागतिक स्तरावरील स्थान अधिक बळकट होईल आणि ती जगातील करमणूक क्षेत्राची राजधानी म्हणून नावारूपाला येईल.
मुख्यमंत्री म्हणाले, “जगाला भारताच्या कलागुणांची, सर्जनशीलतेची आणि प्रतिभेची ओळख करून देण्याची ही एक अभूतपूर्व संधी आहे. या महत्त्वपूर्ण समिटच्या आयोजनासाठी राज्य शासन पूर्ण सहकार्य करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नव्या भारताची नवी ओळख’ जगासमोर मांडण्याचा जो संकल्प केला आहे, त्याच्या पूर्ततेच्या दिशेने हे एक भक्कम पाऊल ठरणार आहे.”
याच अनुषंगाने, केंद्र शासनाच्या मालाड येथील 240 एकर जागेवर जागतिक दर्जाचा एंटरटेनमेंट हब उभारण्यात येणार असून, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) ही अत्याधुनिक संस्था मुंबईला देण्यात आली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेला राज्याचे मुख्य सचिव तसेच केंद्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App