WATCH : संजय राऊत जेवढी चावी दिली तेवढेच बोलतात – केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

Watch Union Minister Raosahbe Danve Criticizes Sanjay Raut in Jalna

Raosahbe Danve : जालन्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. दानवे म्हणाले की, ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावं म्हणून महाविकास आघाडी सरकारमधील वडेट्टीवार, भुजबळ हे मंत्री मोर्चे काढत आहे. तर दुसरीकडे हेच सरकार ओबीसी आरक्षणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलाय. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर काल ईडीकडून छापे टाकण्यात आले यात भाजपचा कोणताही हस्तक्षेप नसून राज्य सरकार त्यांचं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याचा एककलमी कार्यक्रम राबवत असल्याचा आरोप दानवे यांनी केला. राज्य सरकार राज्यात नवे निर्बंध लावत असून राज्य सरकारने शाळा, रोजगार, देवस्थानाबाबत राज्यात सरसकट निर्बंध लादू नये, अशी मागणीही त्यांनी केली. ज्या 4 जिल्ह्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्या रद्द कराव्या अशी आमची मागणी आहे, मात्र निवडणुका रद्द न झाल्यास त्या जिल्ह्यात ज्या ठिकाणी ओबीसींचे उमेदवार होते तिथे ओबीसींचेच उमेदवार भाजप देणार असल्याच दानवे यांनी म्हटलंय. आमच्यामागे तपास संस्था लावल्या गेल्या आहेत आम्ही बघून घेऊ असा ईशारा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर ईडीने टाकलेल्या छाप्यानंतर दिलाय यावर बोलताना संजय राऊत हे जे बोलतात ते कुणाच्यातरी सांगण्यावरून बोलतात त्यांची चाबी फिरवली जाते, असा टोला दानवे यांनी लगावला. ओबीसी आरक्षण रद्द होण्यास केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला असून ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी काँग्रेसही आंदोलन करतंय यावर बोलताना दानवे यांनी अमर, अकबर, अँथनीच्या सरकारमध्ये ताळमेळ नसल्याची टीका केली.  Watch Union Minister Raosahbe Danve Criticizes Sanjay Raut in Jalna

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात