WATCH : काँग्रेसला सोबत घेऊनच विरोधकांची फळी मजबूत – संजय राऊत

WATCH Shiv Sena MP Sanjay Raut Says Congress Is Must For Opposition Front Against BJP

MP Sanjay Raut : तिसऱ्या आघाडीवर शरद पवारांच्या वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, काँग्रेसला सोबत घेऊनच विरोधकांची मजबूत फळी उभी राहू शकते. आम्हीदेखील हेच बोललो होतो. दोन दिवसांपूर्वी सामनामध्ये आम्ही हेच बोललो होतो. या देशात विरोधकांची जी मजबूत फळी उभी करण्याचं काम सुरू आहे काँग्रेस शिवाय हे पूर्ण होऊ शकत नाही. काँग्रेस पक्षाचे नेते दिनेश गुंडोराव यांनीदेखील शिवसेनेच्या भूमिकेचा संदर्भ दिला आहे. या देशातील विरोधी पक्ष एकत्र आला तरच राजकीय पर्याय उभा राहू शकतो. भाजपला आंदोलनं करू द्या. सर्व प्रश्न संपले आहेत असं त्यांना वाटतंय. अनिल देशमुख यांच्या घरावर धाडी पडत आहेत. शरद पवार यांनी म्हंटलय की ते सरकार बनवू शकले नाहीत म्हणून त्यांच्यात निराशा आली आहे. शरद पवार यांचं म्हणणं बरोबर आहे. त्यांनी एजनिस वापरून त्रास द्यायला सुरुवात केली आहे. त्यांनी लक्षात घ्यावं महाराष्ट्राच्या एजन्सीदेखील चांगलं काम करतात. हे लक्षात घ्यावं. आम्हीदेखील पाहून घेतो.  WATCH Shiv Sena MP Sanjay Raut Says Congress Is Must For Opposition Front Against BJP

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात