Late Narayan Dabhadkar : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ८५ वर्षीय ज्येष्ठ स्वयंसेवक नारायण दाभाडकर यांनी तरुणासाठी बेडचा त्याग केला. घरी परतल्यावर दाभाडकर यांचा मृत्यू झाला. नागपूरचे नारायण दाभाडकर यांनी दाखविलेल्या औदार्याचे सोशल मीडियावर कौतुक सुरू असतानाच दुसरीकडे मात्र काही विकृत मानसिकतेच्या लोकांनी एक खोटी क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. त्या रुग्णालयात अशी कुणी व्यक्ती नव्हतीच मुळी, त्यामुळे ते वृत्त खोटे असल्याचे त्यांचे म्हणणे होते. दुसरीकडे, काही जणांनी तर एबीपी माझा या प्रसिद्ध वृत्तवाहिनीची क्लिप फोटोशॉप करून खोटी माहिती प्रसारित केल्याचे उघड झाले आहे. याचा खुलासा खुद्द एबीपी माझाने केला आहे. तर आणखी काही पत्रकारांनी शहानिशा न करता बातम्या प्रसारित केल्याचे दिसून आले. WATCH : Daughter Of Late Narayan Dabhadkar Explains What Happened Actually in Hospital Nagpur
विशेष प्रतिनिधी
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ८५ वर्षीय ज्येष्ठ स्वयंसेवक नारायण दाभाडकर यांनी तरुणासाठी बेडचा त्याग केला. घरी परतल्यावर दाभाडकर यांचा मृत्यू झाला. नागपूरचे नारायण दाभाडकर यांनी दाखविलेल्या औदार्याचे सोशल मीडियावर कौतुक सुरू असतानाच दुसरीकडे मात्र काही विकृत मानसिकतेच्या लोकांनी एक खोटी क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. त्या रुग्णालयात अशी कुणी व्यक्ती नव्हतीच मुळी, त्यामुळे ते वृत्त खोटे असल्याचे त्यांचे म्हणणे होते. दुसरीकडे, काही जणांनी तर एबीपी माझा या प्रसिद्ध वृत्तवाहिनीची क्लिप फोटोशॉप करून खोटी माहिती प्रसारित केल्याचे उघड झाले आहे. याचा खुलासा खुद्द एबीपी माझाने केला आहे. तर आणखी काही पत्रकारांनी शहानिशा न करता बातम्या प्रसारित केल्याचे दिसून आले.
तथापि, या सर्व प्रकरणाचा ‘दै. तरुण भारत’ने शोध घेतला असता त्यांना नारायण दाभाडकर यांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतल्याचे पुरावे सापडले. ‘दैनिक तरुण भारत’मध्ये २७ एप्रिल रोजी नारायण दाभाडकर यांच्याविषयी सविस्तर छापून आले होते. नारायण दाभाडकर यांना घरी घेऊन जात असताना त्यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयाला लिहून दिलेले पत्रही त्यांनी प्रसिद्ध केले आहे.
दै. तरुण भारतने प्रसिद्ध केलेली रुग्णालयातील नोंद.
दाभाडकर कुटुंबीयांनी रुग्णालयाला लिहून दिलेले पत्र
या सर्व प्रकारावर दिवंगत दाभाडकर यांच्या कन्या आसावरी दाभाडकर यांनी व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणतात, आम्हाला त्यांच्या मृत्यूचे भांडवल करायचे नाही. पण त्यांची नाहक बदनामी खूप वेदना देणारी आहे. व्हिडिओमध्ये त्या नेमकं काय म्हणाल्या पाहा…
WATCH : Daughter Of Late Narayan Dabhadkar Explains What Happened Actually in Hospital Nagpur
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App