Kirit Somayya : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी लॉकडाऊनच्या काळात बंगला व रिसॉर्ट बांधल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात मिलिंद नार्वेकर 10-15 कोटींचा बंगला बांधत होते, त्यासाठी बऱ्याच नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी या आरोपांचा व्हीडिओ ट्विटरवर, फेसबुकवर पोस्ट केला असून, त्याद्वारे मिलिंद नार्वेकरांच्या सीबीआय चौकशीची मागणीही केली आहे. सोमय्या म्हणाले, “लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उजवा हात अनिल परब रिसॉर्ट बांधत होते, तर डावा हात मिलिंद नार्वेकर बंगला बांधत होते. एवढंच नाही, मिलिंद नार्वेकर यांनी साडेचारशे झाडं तोडून बंगला उभारायचं काम सुरू केल्याचं सोमय्या म्हणाले. मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे सचिव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव आहेत. किरीट सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे एक वसुलीमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर व मुंबई येथील निवासस्थानांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत; काही दिवसांत ते खात्रीने जेलमध्ये असतील. आणि मला खात्री आहे की काही दिवसांतच ठाकरे यांचे दुसरे वसुलीमंत्री अनिल परब हेदेखील अनिल देशमुखांच्या मार्गाने जातील ! WATCH BJP Leader Kirit Somayya Alligations On Anil Parab and Milind Narvekar
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App