मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी फेसबुक लाईव्ह केले. अनेकांनी ते काय बोलले हेच कळले नाही, असे म्हटले आहे. आजचा काय टीजर होता का ? ससपेन्स कसला ठेवताय आज मी पूर्ण लॉकडाउन घोषित नाही करत पण इशारा देतो ..हे काय आहे, असा सवाल भारतीय जनता पक्षाने केला आहे.Was it teaser for today? BJP targets Uddhav Thackeray
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी फेसबुक लाईव्ह केले. अनेकांनी ते काय बोलले हेच कळले नाही, असे म्हटले आहे. आजचा काय टीजर होता का ? ससपेन्स कसला ठेवताय आज मी पूर्ण लॉकडाउन घोषित नाही करत पण इशारा देतो ..हे काय आहे, असा सवाल भारतीय जनता पक्षाने केला आहे.
राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आॅनलाईन संबोधित केलं. यावेळी त्यांनी काही कडक निर्बंध येत्या काही दिवसांत लावावे लागतील. ते उद्या किंवा परवा जाहीर होतील असा सूचक इशारा दिला.
यावरून भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, लॉकडाउनला पर्याय अजूनही मिळालाच नाही, मग इतकी हवा कसली तयार केली? गांजलेल्या जनतेला आज ठोस निर्णयाची अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली.
आता अजून कुणाशी चर्चा करणार आहात , घ्या की निर्णय की नेहमीप्रमाणेच या बाबतीतही निर्णय दिरंगाई. इतक्या महिन्यांत जे नाही झाले ते पुढच्या दोन दिवसांत काय मोठा चमत्कार घडणार आहे.
अहो सत्य परिस्थिती, वास्तव काय समोर मांडतायङ्घत्याची सर्वाधिक झळ तर आम्हाला बसतेय. या वास्तवाला जबाबदार कोण ? चिंताजनक दिशेने तुम्हीच तर ढकलले.करोनाचे अवतार सांगताय पण सरकारचा खरा अवतार जनतेला दिसला.
ठाकरे म्हणाले होते की, काही कडक निर्बंध येत्या काही दिवसांत लावावे लागतील. ते उद्या किंवा परवा जाहीर होतील. कार्यालयांना याआधीच सूचना दिल्या आहेत. काही नियम आधीच लागू आहेत. सगळ्या ट्रेन तुडुंब भरून चालल्या आहेत. रोजगार परत मिळतील, पण जीव परत मिळणार नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App