मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या निवृत्त न्यायाधीश के. यू. चांदिवाल आयोगाने माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर नव्याने जामीनपात्र वॉरंट जारी केले.Warrant againt Parambir singh
यापूर्वी जारी केलेले वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या मुंबई सीआयडी पथकाला सिंग निवासस्थानी आढळले नाहीत.त्यामुळे आता नव्याने वॉरंट बजावले असून ६ ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचा आदेश आयोगाने दिला आहे. देशमुख यांच्यावर सिंग यांनी जाहीरपणे भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या चांदिवाल आयोगाने अनेकदा सिंग यांना समन्स बजावले आणि दंडही केला; मात्र अद्याप त्यांनी हजेरी लावली नाही. सीआयडीने याबाबत एक अहवाल आयोगापुढे दाखल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App