राज्यात दोन दिवस मुसळधार; मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

विशेष प्रतिनिधी

पुणे: राज्याला पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र परिसरात अतिवृष्टीची भीती आहे.गुलाब चक्रीवादळाचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात झाले असून ते दक्षिण ओडिशा व लगतच्या दक्षिण छत्तीसगडवर आहे.Warning of heavy rains in Marathwada, North Maharashtra

तसेच उत्तर कोकण ते दक्षिण ओडिशा असा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणामी २८ व २९ हे दोन दिवस राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे. गुलाब चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मंगळवारी व बुधवारी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे,



२८ सप्टेंबर रोजी: धुळे, जळगाव, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यासाठी अतिमुसळधार पावसाचा (२०४.५ मिमीपेक्षा जास्त) रेड अलर्ट तर मुंबई, सिंधुदुर्ग, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा (११५.५ ते २०४.५ मिमीपर्यंत) ऑरेंज अलर्ट.

तसेच बुलडाणा, वाशीम, अमरावती, अकोला, उस्मानाबाद. लातूर, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (६४.५ ते ११५.५ मिमीपर्यंत पाऊस) जारी करण्यात आला आहे.
२९ सप्टेंबर : धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर हिंगोली, बीड, परभणी, जालना, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Warning of heavy rains in Marathwada, North Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

 

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात