ठाकरे-शिंदेगटात रंगले शाब्दिक युद्ध; प्रियंका चतुर्वेदी- शिरसाटांमध्ये चारित्र्यावरून ट्विटर वॉर

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटात प्रियंका चतुर्वेदी यांच्या खासदारकीवरून जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वेदी यांना त्यांच्या सुंदरतेमुळे चंद्रकांत खैरे यांना डावलून खासदारकी दिल्याचा आरोप केला होता. त्यावर चतुर्वेदी यांनी मी कशी दिसते हे गद्दार व्यक्तीने सांगण्याची गरज नाही, असे सांगत शिरसाट यांना जोरदार टोला हाणला आहे.War of words raged between Thackeray-Shinde faction; Priyanka Chaturvedi-Twitter war over character in headgear

आदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदी यांचे सौंदर्य पाहून त्यांना राज्यसभेवर पाठवले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीच मला असे सांगितले, असा दावा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यावरून मोठा वाद सुरू झाला आहे. शिरसाट आपल्या विधानातून स्वतःचे चारित्र्य दाखवत असल्याची टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी या प्रकरणी शिरसाट यांच्यावर पलटवार करताना केली आहे.



काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी?

मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही, ज्याने 50 खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला. संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचे एक उत्तम उदाहरण आहे, ते त्यांच्या टिप्पण्यांमधून स्वतःचे असभ्य चारित्र्य निश्चितपणे प्रदर्शित करतात, यात आश्चर्य नाही की भाजपने त्यांना त्यांच्यासोबत ठेवले आहे, असे चतुर्वेदी यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

खैरेंनीच तुमच्या चारित्र्याचे धिंडवडे उडवले

प्रियंका यांच्या या ट्विटनंतर शिरसाट यांनीही एका ट्विटद्वारे त्यावर उलट हल्ला चढवला आहे. ‘आपण कश्या दिसता किंबहुना आपल्या भाषेत सांगायचे झाले तर चरित्र्याचे धिंधवडे आपल्याच पक्ष्यातील श्रीमान खैरे यांनी उडवले आहेत… आपण जे मला विचारत आहत ते त्यांना विचारलं असतं तर अधिक संयुक्तिक ठरलं असतं…आम्ही कुठं तुम्हाला विचारलं की तुम्हांला का.मत ? असो द्यायचं..

गद्दारी तर स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांशी कोणी केली ते दहा पक्ष फिरून आलेल्या कालच्या उपऱ्यांना काय कळणार ? आत्मा… प्रामाणिकपणा… काय छान बोलता… जसं सामान्य कार्यकर्त्या सारखं पोस्टर बॅनर लावंत घाम गाळून खासदार झालाय.. खरा खासदारकी वर हक्क…चंद्रकांत खैरे… दिवाकर रावते…ह्या राबणाऱ्या कार्यकर्त्यांचा होता.. पण तुमची बात जर न्यारी…जाल तिकडे भारी,’ असे शिरसाट यांनी म्हटले आहे.

तत्पूर्वी, पत्रकारांशी संवाद साधतानाही शिरसाट यांनी चारित्र्याच्या मुद्यावरून प्रियंका यांच्यावर सूचक इशारा दिला. प्रियंका चतुर्वेदी यांनी चारित्र्याच्या गप्पा मारू नये. आम्ही चारित्र्य काढायला लागलो तर बात दूर तक जायेगी. प्रियंका यांच्याबद्दल मी काहीच बोललो नाही. मी केवळ चंद्रकांत खैरे काय बोलले हे सांगितले, असे ते म्हणाले.

War of words raged between Thackeray-Shinde faction; Priyanka Chaturvedi-Twitter war over character in headgear

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात