विशेष प्रतिनिधी
गडचिरोली : गडचिरोलीच्या वांगेतुरी येथील नवीन पोलीस पोस्ट येथे ‘पोलीस दादालोरा खिडकी’ च्या माध्यमातून आयोजित भव्य जनजागरण मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अधीकारी व मान्यवरही उपस्थित होते. Wangeturi will be known as the beginning not the last village of Mahashtra Fadnavis
याप्रसंगी फडणवीस म्हणाले, ‘गडचिरोली जिल्हा गेली अनेक वर्षे माओवादाशी संघर्ष करीत असल्याने काही प्रमाणात मागे पडला. मात्र आता येथील लोकांना मुख्य धारेत जावेसे वाटू लागले आहे. मागील काळात पोलिसांबद्दल संशयाचे वातावरण तयार करून ठेवण्यात आले होते. मात्र आता पोलिसांमुळेच विकास लोकांपर्यंत पोहोचत आहे. सरकारी योजना पोलीसच लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. वांगेतुरीचे पोलीस स्टेशन हे विकासाचे दार आहे. पोलीस पोस्ट तयार झाल्याने पोलिसांसोबत विकासकामे करणे सोपे होणार आहे. याठिकाणी लोकांना योजनांचा लाभ घेता येईल.’
तसेच गडचिरोलीत गुंतवणुकीसाठी उद्योजक येत असून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. आता गडचिरोली येथील वांगेतुरी, महाष्ट्राचे शेवटचे गाव नाही तर सुरुवातीचे गाव म्हणून ओळखले जाईल व येत्या काही वर्षांमध्ये याठिकाणी मोठा बदल झालेला पाहायला मिळेल. असंही फडणवीसांनी सांगितलं.
याचबरोबर ‘विविध योजनांच्या अंतर्गत मुला मुलींना, बचत गट व ग्रामपंचायतींना मदत केली जात आहे. येथे मोबाईल कनेक्टिव्हिटी वाढावी म्हणून मोठे टॉवर उभारले जात आहेत. भगवान बिरसा मुंडा योजनेच्या माध्यमातून गावोगावच्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. ‘ असंही यावेळी फडणवीस म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App