Walmik karad वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाली नसल्याचा जेल प्रशासनाचा खुलासा; पण त्यावर बाहेर असलेल्यांचे दावे – प्रतिदावे!!

Walmik karad

विशेष प्रतिनिधी

मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड Walmik karad आणि सुदर्शन घुले यांना बीडच्या जेलमध्ये मारहाण झाल्याची बातमी सगळीकडे पसरली. परंतु प्रत्यक्षात त्या दोघांना तशी कुठलीही मारहाण झाली नसल्याचा खुलासा जेल प्रशासनाने केला, पण या खुलासानंतरही बाहेर राहिलेल्यांनी मात्र मारहाणीवर दावे – प्रतिदावे केले.

जेल मध्ये सकाळी न्याहारीची वेळ झाली म्हणून सगळ्यांना खुले केले. त्यावेळी मोबाईलच्या वादातून महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारले. गीते आणि आठवले हे दोघेही संतोष आंधळे प्रकरणातले आरोपी आहेत. त्या मारामारीत वाल्मीक कराडला देखील दोन-तीन थपडा बसल्या, अशी बातमी पसरली. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन “इनसाईड स्टोरी” सांगितली. त्यानंतर अंजली दमानिया यांनी देखील वाल्मीक कराडला दोन तीन थपडा बसल्या, असे सांगितले पण ही सगळी आपल्याला वेगवेगळ्या “सोर्सेस” मधून माहिती मिळाली, असे सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी सांगितले. कारण ते दोघेही जेलमध्ये नाहीत. ते बाहेर आहेत.

जेल प्रशासनाने मात्र मारामारी झाली, त्यावेळी वाल्मीक कराड आणि सुरेश सुदर्शन घुले तिथे नव्हतेच, असे स्पष्ट केले. मारामारी देखील किरकोळ झाल्याचे जेल प्रशासनाने सांगितले. पण या सगळ्या प्रकारावर मनोज जरांगे यांनी संशय व्यक्त केला. संतोष देशमुख प्रकरणातले सगळेच आरोपी सोंगे करणारे आहेत. त्यामुळे मारामारी झाली नसले तरी मारामारी झाली अशी ते बतावणी करतील. ते सगळे खोटे बोलत असतात. त्यामुळे मारामारी झाल्याच्या बातम्यांवर जेल प्रशासन अधिकृतपणे काही सांगत नाही तोपर्यंत बोलता येणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.

Walmik karad and Sudarshan gule not beaten in jail

Ghibli photos : जगभरात वाढली क्रेझ अन् AI युजर्ससाठी ठरतय खास गिफ्ट!

युजर्सची संख्या इतकी वाढली आहे की ओपन एआयच्या सर्व्हरवरील भार खूपच वाढला आहे


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: Ghibli photos ओपन AIच्या चॅटजीपीटीने एक नवीन टूल लाँच करून इंटरनेटवर वादळ निर्माण केले आहे, ज्यामुळे आता कंपनीची झोप उडाली आहे. स्टुडिओ घिबली (घिबली इमेज) या कंपनीचे हे एक नवीन वैशिष्ट्य आहे, जे आजकाल लोकांना वेड लावत आहे. युजर्सची संख्या इतकी वाढली आहे की ओपन एआयच्या सर्व्हरवरील भार खूपच वाढला आहे. अशा परिस्थितीत, कंपनीच्या सीईओंना स्वतः ट्विट करून लोकांना विनंती करावी लागली की कृपया आमच्यासाठी काहीतरी करा आणि आमच्या टीमलाही थोडा आराम द्या.Ghibli photos



कल्पना करा, तुमचा सामान्य फोटो काही सेकंदात स्टुडिओ घिबलीच्या जादुई जगात रूपांतरित होतो. लोकांचे हे स्वप्न आता ChatGPT च्या नवीन इमेज जनरेशन फीचरमुळे खरे ठरले आहे. पण गिब्ली स्टाईलचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत असल्याने, ओपनएआय टीमवर खूप दबाव आहे. कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर आवाहन केले की, ‘तुम्ही कृपया थोडी वाट पाहू शकाल का, आमच्या टीम सदस्यांनाही झोपण्याची गरज आहे.’

घिबली प्रतिमा कशा तयार करायच्या

ChatGPT अॅप किंवा वेबसाइट उघडा. खालील ‘+’ चिन्ह वापरून तुमचा फोटो अपलोड करा. प्रकार: हे गिब्लीफाय करा किंवा हा फोटो स्टुडिओ गिब्ली थीममध्ये रूपांतरित करा. थोड्या वाटेनंतर, तुम्हाला एक रमणीय घिबली-शैलीची प्रतिमा मिळेल. मोफत चॅटजीपीटी वापरकर्त्यांसाठी, ही मर्यादा आता दररोज तीन फोटोंपर्यंत कमी करण्यात आली आहे.

Ghibli photos are becoming increasingly popular worldwide

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात