विशेष प्रतिनिधी
पुणे : वसुबारस या पवित्र सणाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाकळवाडी येथे आयोजित विशेष ग्रामसभेत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात सर्वात प्रथम गोवंश संरक्षणाचा ठराव एकमुखीने मंजूर करणारी ग्रामपंचायत म्हणून वाकळवाडी ग्रामपंचायतीने राज्यात नवा आदर्श निर्माण केला आहे.
या ऐतिहासिक ठरावानुसार, गावातील कोणताही गोवंश कत्तलखान्याकडे जाणार नाही, याची सामूहिक जबाबदारी सर्व ग्रामस्थांनी स्वीकारली आहे. तसेच शेतकऱ्यांना कसाई व त्यांच्या एजंटांकडून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. भाकड गोवंश विकायचा असल्यास तो थेट ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच विकावा, असा निर्णय घेतला गेला आहे. ग्रामपंचायतीच्या या ठरावातून “गावाचा सन्मान, धर्माचा अभिमान आणि गोमातेचे रक्षण” हा संदेश अधोरेखित झाला आहे.
गोरक्षक श्री. शिवशंकर स्वामी व श्री. संतोष बारणे , श्री. निखिल बोऱ्हाडे , श्री. गणेश सस्ते , श्री. अनिकेत सस्ते यांच्या उपस्थितीमध्ये वाकळवाडीचे सरपंच श्री. नरेंद्र वाळुंज यांनी गोवंश संरक्षण ठरावाचे पत्र सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आले. ग्रामपंचायत गोसासी, वाफगाव, गुळाणी, चिंचबाईवाडी आणि गाडकवाडीचेही प्रतिनिधी उपस्थित होते.
भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर वाकळवाडीकरांच्या गोवंश संरक्षणाच्या निर्णयाची प्रत शेअर केली आणि वाकळवाडीकरांचे विशेष अभिनंदन केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App