वृत्तसंस्था
पंढरपूर : देशभरातील भाविकांकडून विठुरायाला प्रेमाने आणि भक्तिभावाने अर्पण केलेले लहान-लहान सोन्या-चांदीचे दागिने वितळवून विठ्ठल रुक्मिणीला नवे अलंकार बनविण्यात येणार आहेत. याबाबतचा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला. Vitthal-Rukmini will get new ornaments, gold-silver ornaments now melt; Decision of Pandharpur Temple Committee
मंदिर समितीकडे १९८५ सालापासून जवळपास २८ किलो सोन्याचे आणि ९९६ किलो चांदीचे हजारो लहान-लहान दागिने जमा झाले होते. याची संख्या मोठी आहे. त्यामुळे समितीला हे सोन्या-चांदीचे दागिने पोत्यात भरून ठेवण्याची वेळ आली होती.
समितीच्या बैठकीत या दागिन्यांचे नवे अलंकार बनविण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी वृत्तवाहिनीला दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App