ओमर – मेहबूबा पाटण्यात विरोधकांच्या बैठकीत सामील, तर श्रीनगरमध्ये अमित शहांच्या हस्ते (झेलम नव्हे), वितस्ता सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन!!

वृत्तसंस्था

श्रीनगर : एकीकडे जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती विरोधकांच्या बैठकीसाठी पाटण्याला गेले असताना, दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मात्र श्रीनगर मध्ये येऊन वितस्था सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन केले. Vitasta Cultural Festival inaugurated by Amit Shah in Srinagar

झेलम या नदीचे मूळ संस्कृत नाव वितस्ता आहे. इस्लामी आक्रमकांनी तिचे नाव बदलून झेलम ठेवले होते. मात्र आता तिच्या मूळ नावाने जम्मू – काश्मीर सरकारने “विस्तता सांस्कृतिक महोत्सव” आयोजित केला आहे. जम्मू काश्मीरच्या सर्व पारंपारिक कलांचे प्रदर्शन या वितस्ता संस्कृतिक महोत्सवात होणार आहे. या वितस्ता महोत्सवाचे उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते आज झाले.

एकीकडे मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला पाटण्यात विरोधी ऐक्याच्या बैठकीत सामील झाले. आम्ही महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंच्या भारतात सामील झालो होतो. आत्ताचा भारत आमचा नव्हे, असे वक्तव्य मेहबूबा मुफ्ती यांनी केले, तर 370 कलमा बाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतलेल्या भूमिकेवर ओमर अब्दुल्ला यांनी टीकास्त्र सोडले. जम्मू काश्मीरचे दोन माजी मुख्यमंत्री आपले राज्य सोडून पाटण्यात विरोधकांच्या बैठकीला बैठकीत सामील झाले असताना श्रीनगर मध्ये वितस्ता सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन होणे, याला विशेष महत्त्व आहे.

जम्मू – काश्मीरचा हिंसाचाराचा इतिहास गेल्या 40-45 वर्षांचा आहे. पण त्या आधीपासून जम्मू-काश्मीर ही संत महात्म्याची भूमी राहिली आहे. आद्य शंकराचार्यांनी काश्मीरमध्ये शारदा पीठ स्थापन केले. इथूनच असंख्य विद्वान शिकले आणि जगाच्या विविध भागात भारताचा शांतीचा संदेश घेऊन गेले, याकडे अमित शाह यांनी लक्ष वेधले.

– शस्त्रे – दगड नव्हे, पेन लॅपटॉप!!

जम्मू-काश्मीरच्या युवकांच्या हातात ज्यांनी दगड आणि शस्त्रे सोपवली, त्यांची स्वप्ने कधीच पूर्ण होणार नाहीत. या युवकांच्या हातात आता दगड आणि शस्त्र यांच्या ऐवजी पेन लॅपटॉप हवे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जम्मू – काश्मीर मधले 370 कलम हटविल्यानंतर विकासाच्या सर्व वाटा सर्व समाजाला खुल्या झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात या राज्यात फार मोठे बदल घडलेले दिसतील, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.

मात्र, झेलम सांस्कृतिक महोत्सव या ऐवजी वितस्ता सांस्कृतिक महोत्सव असे नामकरण केल्याने जम्मू – काश्मीरच्या मूळ हिंदू संस्कृतीचा गौरव झाला आहे.

Vitasta Cultural Festival inaugurated by Amit Shah in Srinagar.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात